मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : मेष राशीच्या लोकांची आर्थिक घडी चांगली बसेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : मेष राशीच्या लोकांची आर्थिक घडी चांगली बसेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 18, 2024 09:21 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 18 january 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी गुरुवारचा दिवस कसा राहील, जाणून घ्या राशीभविष्य.

Aries Taurus Gemini
Aries Taurus Gemini

Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज गुरुवार रोजी दुर्गाष्टमी आणि सिद्ध योग असा दुहेरी शुभ योग आहे. चंद्र मेष राशीत संक्रमण करतोय. मेष, वृषभ, मिथुन तिन्ही राशींसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज चंद्र-हर्षल युतीयोगात आपण केलेल्या कामाची सुरुवात चांगली होईल. कष्टाने का होईना जूनी येणी वसूल होतील. त्यामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आनंद वाटेल. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक प्रगतीच्या नवीन व संधी प्राप्त होतील. व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या व मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. प्रशंसा व मानसन्मान मिळेल. भावडांशी चांगले संबंध राहतील. मानसिक व शारीरिक स्वास्थ लाभणार आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. अल्पकालीन गुंतवणुकीत नुकसान होऊ शकते.

शुभरंग: केशरी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०९.

वृषभः 

आज सिद्ध योगात तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. पैसा खर्च करण्यातही लहरीपणा जाणवेल. कुठेही धोका पत्करण्याची तयारी ठेवाल. अती महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. आखलेले योजना काही वेगाने मार्गी लागतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. परंतु बोलण्यावर संयम ठेवा. स्पर्धकांवर मात कराल. आपल्या योजना आज सफल होणार आहेत. सर्वच बाबतीत समाधान लाभेल. मनाप्रमाणे घटना घडतील. मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. व्यवसायात उत्तम लाभ होतील. घरातील आनंदी वातावरण मानसिक सौख्य देणारं असेल. गुढशास्त्राची आवड निर्माण होतील. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल.

शुभरंग: नारंगी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

मिथुनः 

आज चंद्र अनिष्ट योगात आहे. घरामध्ये थोडे संघर्षात्मक वातावरण राहिले तरी तडजोडीचे धोरण स्वीकारल्यास गोष्टी टोकापर्यंत जाणार नाही. आपणास प्रतिकुल फले मिळण्याची शक्यता आहे. कितीही स्पर्धांना संकटांना तोंड द्यावे लागले तरी मन:शांती ढळू देऊ नका. विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शेअर्समधील मोठी गुंतवणूक टाळावी. व्यापारी वर्गानी काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. बोलघेवडेपणा शक्यतो टाळा. अन्यथा आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी विरोध मतं निर्माण होईल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल असी स्थिती आहे. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०२, ०६.