मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : मिथुन राशीच्या लोकांना मनासारखे वातावरण लाभेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : मिथुन राशीच्या लोकांना मनासारखे वातावरण लाभेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 17, 2024 11:14 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 17 february 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

mesh vrishabh mithun
mesh vrishabh mithun

Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज १७ फेब्रुवारी शनिवार रोजी, दुर्गाष्टमीचा चंद्र वृषभ राशीतुन भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ व मिथुन तिन्ही राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.

मेषः 

आज राशीस्वामी मंगळ आणि चंद्र संयोग होत असल्याने आपणास अनपेक्षीत आंनदाची बातमी मिळेल. आजूबाजूच्या जगात व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी दिवस आहे. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारी वर्गाला आर्थिक फायद्याचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही दिवस राहील.

शुभरंग: नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.

वृषभः 

आज ऐंद्र योगात आपणास कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. आर्थिक स्थिती बरी राहिली तरी ऐपत असूनही काही गोष्टींबाबत निरीच्छ राहाल. सर्व बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. स्वत:चे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. चिकाटी जिद्द आणि स्थैर्य कामी येईल. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. उद्योग व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. कुटुंबातुन विशेष सहकार्य लाभेल. ग्रंथ लिखाणास उत्तम दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती राहील. संशोधनपर कार्यात मानसन्मान मिळेल.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

मिथुनः 

आज चंद्राचा शुक्राशी संयोग होत असुन नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार यासाठी अनुकुलता राहील. परदेशगमनाचे योग येतील. घरामध्ये अचानक उद्भभवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. नोकरीत बदल करायची इच्छा असणाऱ्यांनी निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संततीची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल रहिल. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलेसाठी चांगले वातावरण आहे. व्यापारात आर्थिक प्रगती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभणार आहे.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर,शुभअंकः ०३, ०६.