Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज करिदीन आणि भद्राकाळ आहे. चंद्रमा शनिच्या नक्षत्रातुन गोचर करणार असून केतुशी प्रतियोग करणार आहेत. मेष, वृषभ, मिथुन तिन्ही राशींसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य.
आज केतुशी होणारा चंद्रयोग पाहता किरकोळ मुद्यांवर तात्त्विक वाद उकरून काढाल. इतरांना होणाऱ्या त्रासाची अजिबात पर्वा करणार नाही परंतु यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जातील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. काही क्षुल्लक गोष्टींबाबत मानसिक त्रास होण्याची शक्यता. व्यवसायात जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीत बदल करण्याच्या संधी वा मुलाखती लांबणीवर पडतील. कौटुंबिक पातळीवर कुटुंबातील सदस्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात आर्थिक नियोजानावर सावधानीपूर्वक निर्णय घ्या. मुलाची चिंता सतावेल. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढणार आहे. दुरवरचे प्रवास टाळावेत. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. नियोजीत कार्य पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल.
शुभरंग: नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.
आज चंद्र-केतु संयोग पाहता उद्योगक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. नवीन योजना राबवाल. कलेच्या क्षेत्रात खूप काम कराल परंतु त्यासाठी लगेच संधी मिळणार नाही. तुमची बौद्धीक आणि मानसिक उन्नती होईल. नावलौकिक मिळेल. रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. व्यापारात काहीबाबतीत अडचणी निर्माण होतील. आज व्यवहारात सावधपणा बाळगा. आर्थिक बळ कमी पडल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. मनावर नियंत्रण ठेवा. शांत आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.
आज शनिच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ नक्की मिळेल. हाताखालच्या लोकांचे सहकार्य चांगले मिळेल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील. रोजगारात अत्यंत महत्वपूर्ण कामात सावधानतेने पाऊल उचला. कामात उत्साह वाढणार आहे. जबाबदारीत वाढ होईल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमत्ता संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणीं कडून सहकार्य लाभणार आहे. एकंदरित कामकाजा साठी दिवस चांगला राहणार आहे.
शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.