मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : मिथुन राशीच्या लोकांचे कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन! वाचा राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : मिथुन राशीच्या लोकांचे कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन! वाचा राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 13, 2024 09:03 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 13 january 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी शनिवारचा दिवस कसा राहील, जाणून घ्या राशीभविष्य.

Aries, Taurus, Gemini
Aries, Taurus, Gemini

Mesh Vrishabh Mithun horoscope today : चंद्र मंगळाच्या आणि श्रवण या स्वनक्षत्रातुन गोचर करीत असून, शनिच्या राशीतुन संक्रमण करीत आहे. मेष, वृषभ, मिथुन तिन्ही राशींसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य.

मेष: 

आज कर्म स्थानात चंद्र असणार आहे. आपली कामे करून घेण्यासाठी एखादे वेळी पडती बाजू घेतली तरी चालणार आहे. परदेशी गोष्टी खरेदीचे योग येतील. स्वच्छंदीपणा थोडी स्वार्थी वृत्ती ठेवणार आहात. घरा मध्ये तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. आर्थिक निर्णय जबाबदारीने घ्यावे लागतील. दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता तुम्हाला बरोबर लागणार आहे. पूर्ण स्वार्थ व स्वार्थ त्याग अशा दोन पराकोटीच्या भावनांना सामोरे जाणार आहात. समानसिक स्वास्थ सांभाळा. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकारवृत्ती मुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्ज प्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावु शकते.

शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०२, ०९.

वृषभ: 

आज योग चांगले आहेत. तुमच्या कामाचा वेग आणि धाडस वाखाणण्यासारखे असेल. व्यवहारात कोणत्या वेळी कसे निर्णय घ्यावे याची जाण येईल. धंद्यात चांगली प्रगती कराल. लहानात लहान होऊन आणि मोठ्यात मोठे होऊन रमून जाल. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. आपल्या इष्ट देवतेची उपासना आणि चिंतन मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडेल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. आरोग्याच्या थोडयाफार समस्या उद्‌भवतील. परिवारातून शुभ संदेश मिळतील. कुटुंबासोबत दुरवरच्या प्रवासाचं नियोजन कराल.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०६.

मिथुन: 

आज चंद्रबल उत्तम असल्याने उत्तम नियोजनामुळे नोकरीत कौतुकास पात्र ठराल. व्यवसायात कष्ट जास्त पण त्यामानाने पैसा मात्र लगेच दृष्टी पडणार नाही. कलाकाराना आपली कला लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळेल. उत्तम कलाकृतीसाठी कौतुकास पात्र ठराल. फायदा तोटा बाजूला ठेवला तरी धंद्यामध्ये तुमच्या बुद्धीची झलक आणि योग्य समयसूचकता दिसून येईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लागेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. सहकाऱ्यांसोबतचे वाढविवाद मात्र टाळावे. आर्थिक बाबतीत लाभाच्या दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.