मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : वृषभ राशीच्या लोकांना उत्तम आर्थिक योग! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : वृषभ राशीच्या लोकांना उत्तम आर्थिक योग! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 12, 2024 09:22 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 12 january 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी शुक्रवारचा दिवस कसा राहील, जाणून घ्या राशीभविष्य.

aries taurus gemini
aries taurus gemini

Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज हर्षण आणि वज्र योगात चंद्रदर्शनाचा शुभ योग आहे. मेष, वृषभ, मिथुन तिन्ही राशींसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य.

मेष: 

आज ग्रहयोग अनुकुल असल्याने लोकांच्या मनात तुमच्याबद्दल सुप्त दरारा निर्माण कराल. घरातील शांतता ढवळून निघेल. वडिलोपार्जित इस्टेटीचे वाद चिघळतील. नोकरी धंद्याच्या ठिकाणच्या आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल. खूप दिवसां पासून अडलेली ऑर्डर हातात पडेल. परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल. संवाद वाढेल. आणि त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. मनात उर्जा निर्माण करणारा दिवस आहे. रोजगारात आर्थिक लाभ होईल. आपली स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामजस्य राहील. व्यापारात वाढ होवुन अनुकुल स्थिती राहणार आहे. वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कामाला लागा. घर वाहन खरेदीचा योग आहे. वडिलांच्या सहकार्याने व्यवसायातील अडचणी दुर होतील.

शुभरंगः नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.

वृषभ: 

आज वज्र योगात खूप दिवसांपासून अडकलेले पैसे हातात पडतील. श्रमसाफल्याचा अनुभव घ्याल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. परदेश प्रवासाचे बेत आखाल. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. घरामध्ये तरुण वर्गाची ये जा राहील. तापटपणा आवरावा लागेल. आर्थिक स्थिती सुधारेल. स्वत:मध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल. नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबातील सुखद वातावरण निर्माण होईल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. प्रतिष्ठा आणि प्रतिभा वृद्धिंगत होईल.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०४, ०७.

मिथुनः 

आज चंद्राची स्थिती लक्षात घेता स्वत:ची मते बिनधास्त मांडून आपल्या मताशी ठाम रहाल. राजकारणी आणि मुत्सद्दी स्वभावामुळे हरतऱ्हेचे डावपेच खेळायला तुम्ही तयार असाल. लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल. उपासना करून आध्यात्मिक उंची गाठाल. नवनवीन योजना डोक्यात घोळतील आणि त्या राबवण्यासाठी कष्टाचे डोंगर उपसाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यात वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जोडीदार नोकरीत असेल तर प्रमोशन बढतीचे योग आहेत.

शुभरंग: पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.