मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : मिथुन राशीच्या लोकांची फसगत होईल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Mesh Vrishabh Mithun horoscope today : मिथुन राशीच्या लोकांची फसगत होईल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 10, 2024 08:55 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 10 january 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी बुधवारचा दिवस कसा राहील, जाणून घ्या राशीभविष्य.

aries taurus gemini
aries taurus gemini

Mesh Vrishabh Mithun horoscope today : आज चंद्र धनु राशीत संक्रमण करेल, ध्रुव योगात कसा असेल आजचा दिवस! मेष, वृषभ, मिथुन तिन्ही राशींसाठी दिवस कसा राहील. वाचा राशीभविष्य.

मेष: 

आज ध्रुव योगात सुविधा मिळाल्यामुळे कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. संतुलित विचाराचा पाठपुरावा करण्याच्या तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होणार आहे. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही प्रश्नाची उकल तुमच्याकडून फार चांगली होत असल्यामुळे अनेक जणांचे सल्लागार बनाल. मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.

वृषभ: 

आज चंद्राचं बुधाच्या राशीतुन होणारं भ्रमण आपल्या व्यक्तीत्वामध्ये सुधारणा करावी असे सारखे वाटत राहील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. शासकीय सेवेतील मंडळीना देखील उत्तम दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदन मिळेल. दुसर्‍याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. विरोधक आक्रमक होतील त्यांचा वेळीच बिमोड कराल तर यशस्वी व्हाल.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०७.

मिथुन: 

आज अनिष्ट ग्रहमान असल्याने दिवस प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणारा आहे. आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. तुमच्या प्रेमळ आणि मर्यादशील स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल. घरात पाहिजे तेवढे लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांचीच चिडचिड होईल. मानसिक परेशानी क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. आर्थिक हानी होण्याची संभवना आहे. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आरोग्य बाबतीत विशेष काळजी घ्यावी. प्रवास नुकसानकारक राहिल.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.