मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun horoscope today : व्यसनांवर आवर घाला,दिवस मेष, वृषभ व मिथुनसाठी कसा पाहा

Mesh Vrishabh Mithun horoscope today : व्यसनांवर आवर घाला,दिवस मेष, वृषभ व मिथुनसाठी कसा पाहा

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 01, 2024 08:56 AM IST

Aries Taurus Gemini rashi bhavishya today 1 january 2024 : राशीचक्रातील पहिल्या तीन राशी समजल्या जाणाऱ्या मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी नववर्षाचा पहिला दिवस कास राहील, जाणून घ्या राशीभविष्य.

Mesh Vrishabh Mithun
Mesh Vrishabh Mithun

Mesh Vrishabh Mithun horoscope today : आयुष्यमान योगात कसा असेल नववर्षातील पहिलाच दिवस! मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा असेल नववर्षाचा पहिला सोमवार, वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज चंद्र शुक्राशी संयोग करीत असल्याने व्यापार व्यवसायात कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा. व्यवहारात नवनवीन गोष्टींचे जरा जास्तच आकर्षण राहील. नोकरी व्यवसायात सरकारी कामकाजामुळे काही कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील. काही सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. अतिआत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका. व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. शुभकार्यात सहभाग घ्याल. यश व उत्साह वाढणार आहे. संकुचित मनोवृत्ती टाळा. विद्यार्थीवर्गाची विद्याभ्यासात प्रगती होईल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहिल. आपल्या व्यसनांवर आवर घाला. कुटंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष दयावे. अचानक लाभ होतील.

शुभरंग: केसरी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०९.

वृषभ: 

आज शुक्राच्या नक्षत्रातील संक्रमणात तुमच्या अत्यंत सौम्य स्वभावामुळे त्याचा फायदा कोणी घेत नाही ना याकडे लक्ष द्या. आपणास कठोर भुमिकेत राहावं लागेल. घरामध्ये कोणाच्याही आजारपणासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. संततीच्या बाबतीत दोन पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल. वाईट सवयीचा त्याग करा. नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहिल. आपल्या महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा करू नये. संयम ठेवून वाटचाल करावी. सकारात्मक विचार ठेवा.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

मिथुनः 

आज आपल्या राशीचा स्वामी चंद्र शुभ स्थानात आहे. प्रबळ आत्मविश्वास आणि परिस्थितीचा अचूक अंदाज तुमच्या कामाचा दर्जा सुधारून टाकेल. मुलांसाठी जरा जास्त लक्ष द्यावे लागे. दोन पिढ्यांनी समजुतीचे धोरण स्वीकारावे लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात आपले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. बढ़ती व बदलीसाठी उत्तम दिवस आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दुरचे प्रवास घडतील. परदेशगमनाचे योग आहेत. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल.स्वतःच्या मनाने विचाराअंतीच निर्णय घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. साहित्यिक संपादन या बौद्धिक अधिष्ठान असणाऱ्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.