Meen Rashi Yearly Horoscope : मीन राशीसाठी २०२५ कसे जाईल? वाचा वार्षिक राशीभविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Meen Rashi Yearly Horoscope : मीन राशीसाठी २०२५ कसे जाईल? वाचा वार्षिक राशीभविष्य

Meen Rashi Yearly Horoscope : मीन राशीसाठी २०२५ कसे जाईल? वाचा वार्षिक राशीभविष्य

HT Marathi Desk HT Marathi
Dec 29, 2024 07:37 PM IST

Pisces Horoscope 2025 in Marathi : राशीचक्रातील बारावी रास असलेल्या मीनला २०२५ हे वर्ष कसे जाईल? आर्थिक, करिअर, आरोग्य या क्षेत्रात नेमकं काय होईल जाणून घेऊया…

Meen Rashi Yearly Prediction : मीन राशीसाठी २०२५ कसे जाईल? वाचा वार्षिक राशीभविष्य
Meen Rashi Yearly Prediction : मीन राशीसाठी २०२५ कसे जाईल? वाचा वार्षिक राशीभविष्य

Meen Rahi 2025 : मीन राशीच्या बाबतीत येणारं २०२५ हे वर्ष खास असणार आहे. या वर्षात पैसे, करिअर, आरोग्य याबाबतीत नेमकं काय होईल? जाणून घेऊया सविस्तर

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार २०२५ हे वर्ष मीन राशीच्या लोकांसाठी फलदायी आणि भाग्यदायी असणार आहे. या वर्षात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील आणि तुमची बौद्धिक क्षमताही वाढेल.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार २०२५ मध्ये मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडतील. स्वभावानं निर्भिड, रोमँटिक आणि विचारशील आहेत, त्या मीन राशीच्या लोकांना ग्रहांच्या बदलामुळं चांगलं परिणाम मिळतील. नशिबाची साथ मिळेल.

साडेसाती संपणार

२०२५ मध्ये मीन राशीची साडेसाती संपणार आहेत. २९ एप्रिल २०२२ रोजी सुरू झालेला आणि २९ मार्च २०२५ रोजी संपणारा आठवडा साडेसातीचा आहे. सगळं काही सुरळीत व्हावं असं वाटत असेल तर २०२५ मध्ये मीन राशीच्या लोकांनी मांस, दारू आणि कामवासनांपासून दूर राहावं. मुलींची आणि दुर्गा देवीची पूजा करावी.

सुख समृद्धी

२०२५ मध्ये तुम्हाला कौटुंबिक सुखाचा लाभ होईल. तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता किंवा बांधू शकता. हे काम मध्य मे महिन्याच्या आधीच करावं. कारण या वेळेनंतर मनात संभ्रम निर्माण होऊन चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे, जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर मेच्या मध्यापूर्वी हे करणं चांगलं आहे.

कुटुंब

२०२५ मध्ये, जानेवारी ते मार्च दरम्यान कुटुंबातील सदस्यांमध्ये काही तणाव असू शकतो परंतु मार्च नंतर संबंध सुरळीत होतील. २०२५ चा पूर्वार्ध कौटुंबिक जीवनासाठी चांगला असेल. परंतु मे नंतर, कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्यानं पती-पत्नीमध्ये भांडणं होतील. ज्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. तुम्ही या वर्षी लग्न करण्याचा विचार करत असाल तर मे पर्यंत करा. नंतर बृहस्पतिच्या प्रभावाखाली वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. पण तुमचं प्रेमजीवन चांगलं राहील.

आर्थिक पैलू

२०२५ मध्ये मार्चनंतर आर्थिक बाबतीत यश मिळू शकते. मार्चनंतर आर्थिक वृद्धी आणि लाभ होण्याची शक्यता आहे. पण मे पासून तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळू लागतील. जे शंभर टक्के नसले तरी तुम्हाला ऐंशी टक्के फायदा मिळू देऊ शकतात.

नोकरी

2025 च्या सुरुवातीला कार्यालयीन सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात, परंतु मेच्या मध्यानंतर परिस्थिती बदलेल. हे वर्ष सरासरी निकाल देत आहे. तुम्हाला धीर धरावा लागेल आणि कार्यालयातील अंतर्गत राजकारण टाळावे लागेल.

व्यवसाय

२०२५ हे वर्ष व्यापाऱ्यांसाठी संमिश्र असेल. बुध ग्रहाच्या प्रभावाखाली तुम्हाला चांगले परिणाम मिळतील पण आळशीपणामुळं तुम्ही पूर्ण मन लावून काम करू शकणार नाही. त्याचा परिणाम व्यवसायावर दिसून येईल. पण मे महिन्याच्या मध्यानंतर गुरूच्या कृपेनं तुम्ही जेवढं काम कराल तेवढं फळ मिळेल.

शिक्षण

२०२५ मध्ये गुरूच्या कृपेनं विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा लाभ होऊ शकतो. बुधाचेही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमची कामगिरी इतरांपेक्षा चांगली राहील. घरापासून दूर राहून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगलं असू शकतं. कठोर परिश्रमानंतर तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळतील.

आरोग्य

मार्च २०२५ पासून शनीच्या प्रभावामुळं तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. तुम्हाला सुस्ती येईल. ऊर्जेची, उत्साहाची कमतरता जाणवेल. विशेषतः गुडघे, कंबर आणि हातांमध्ये वेदना होऊ शकतात. आपल्या आहाराची काळजी घ्या आणि वर्षभर निरोगी राहा.

Whats_app_banner