मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Swapna Shastra : स्वप्नात हत्तीचा कळप पाहाण्याचा काय आहे अर्थ?
स्वप्नात हत्ती पाहाण्याचा अर्थ काय आहे
स्वप्नात हत्ती पाहाण्याचा अर्थ काय आहे (Freepik)

Swapna Shastra : स्वप्नात हत्तीचा कळप पाहाण्याचा काय आहे अर्थ?

01 April 2023, 8:41 ISTDilip Ramchandra Vaze

See Elephant flock In Dream : स्वप्नात काळा हत्ती पाहिल्यास त्याचा काय अर्थ काढावा, पांढरा हत्ती पाहिल्यास त्याचा अर्थ काय आहे, याबाबत काय सांगतं स्वप्न शास्त्र.

स्वप्न पाहाणं ही एक सर्वसामान्य प्रक्रीया आहे. रात्री झोपल्यावर सर्वजण स्वप्नं पाहातात.कधी एखादं भयानक संवप्न आपल्याला झोपेतुन खडबडून जागं करतं तर कधी एखादं मजेशीर स्वप्न आपल्याला पोट धरुन हसवतं. कधी एखादं गूढ आपल्याला विचार करायला भाग पाडतं तर कधी आपल्या आसपास झालेल्या घटनाही आपल्याला स्वप्नात पाहायला मिळतात. स्वप्न ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी खास अर्थ दडलेला असतो असं स्वप्नशास्त्र सांगतं. आज आपण अशाच एका स्वप्नाबद्दल बोलणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

स्वप्नात पांढरा हत्ती दिसणे

स्वप्नात पांढरा हत्ती पाहाण्याचा अर्थ काहीतरी शुभ गोष्ट घडणार आहे असा होतो. हे स्वप्न एक शुभ चिन्ह आहे असं मानलं जातं. लवकरच एखादी आनंदाची बातमी तुमच्या कानी येणार आहे असाही त्याचा अर्थ होतो.

स्वप्नात काळा हत्ती दिसणे

सावधानता बाळगण्याचा किंवा सतर्क राहाण्याचा हा एक इशारा आहे असा अर्त स्वप्नात काळा हत्ती पाहायला मिळणे याचा होतो. स्वप्नशास्त्रानुसार या स्वप्नाने तुम्हाला सतर्क केलं आहे असाही होतो. आगामी काळात काही संकट उभं राहू शकतं, याचं हे द्योतक मानलं जातं.

स्वप्नात हत्तीचा कळप दिसणे

ही एक शुभ घटना स्वप्न शास्त्र मानतं. यानुसार तुम्हाला लवकरच काही चांगली बातमी कानी ऐकू येणार आहे असा त्याचा अर्थ आहे. तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होणार असल्याचंही हे स्वप्न सांगतं.

गर्भवतीला स्वप्नात हत्ती दिसणे

याचा अर्थ असा आहे की तुम्हाला भाग्यवान मुलगा तुमच्या पोटी जन्माला येणार आहे. मुलाची बुद्धी अत्यंत कुशाग्र असण्याचंही हे स्वप्न दर्शवतं.जर एखाद्या गर्भवती महिलेला स्वप्नात हत्ती दिसला तर ते खूप चांगले स्वप्न मानले जाते.

स्वप्नात हत्ती तुमच्यावर हल्ला करत असल्यास

जर तुम्हाला स्वप्नात दिसले की हत्ती तुमच्यावर हल्ला करत आहे. याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काही समस्या असू शकतात. दुसरीकडे, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात हत्तीची भीती वाटत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातील अडचणींवर मात कराल आणि पुढे जाल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग