ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह एका निश्चित कालावधीत आपले स्थान बदलत असतात. यालाच ग्रहांचे गोचर असे म्हणतात. प्रत्येक ग्रहांच्या गोचरचा कालावधी वेगळा असल्याने, त्यांच्या आपापसांत संबंध यायला बराच कालावधी जातो. त्यामुळेच अनेक ग्रह जास्त कालावधीनंतर एकमेकांच्या सानिध्यात येतात. असंच काहीसं सध्या ज्योतिषीय अभ्यासात पाहायला मिळत आहे. काल १५ जुलै २०२४ रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ आणि युरेनस हे एकमेकांच्या जवळ आले आहेत. या दोघांच्या युतीतून शुभ संयोग निर्माण होत आहे. मंगळ आणि युरेनस तब्बल ३ वर्षांनंतर युती करत आहेत. त्यामुळेच हा कालावधी अत्यंत खास असणार आहे. मंगळ आणि युरेनसच्या संयोगातून काही राशींना प्रचंड लाभ मिळणार आहे. पाहूया त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत.
मंगळ आणि युरेनसच्या संयोगाचा शुभ लाभ मेष राशीच्या लोकांनासुद्धा होणार आहे. कारण ही युती या राशीच्या धन या घरात होत आहे. याकाळात तुम्हाला प्रचंड धनलाभ होणार आहे. कमाईचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. आर्थिक आवक वाढल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी बदलाचा विचार असणाऱ्यांना चांगल्या ठिकाणी संधी मिळेल. कार्यक्षेत्रात नावलौकीक होईल. तुमच्या बौद्धिक क्षमतेत विशेष वाढ होईल. व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल. व्यवसाय विस्तारेल.
मेष आणि युरेनसच्या युतीचा सकारात्मक प्रभाव वृषभ राशीच्या लोकांवर पडणार आहे. या युतीच्या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध सुधारतील. महत्वाच्या कार्यात कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. वैवाहिक लोकांच्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदेल. तर अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. त्यातून नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल.
मंगळ आणि युरेनसचा संयोग कर्क राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. वेळोवेळी धनलाभ होतील. त्यामुळे आर्थिक चणचण संपेल. आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. उद्योग-व्यवसायात नव्या डील पदरात पडतील. भविष्यात त्यातून मोठा आर्थिक नफा होईल. कोणत्याही क्षेत्रात केलेली आर्थिक गुंतवणूक लाभदायक ठरणार आहे. नोकरीत तुमच्या कामावर वरिष्ठ प्रभावित होतील. जोडीदारासोबत लग्नाच्या दृष्टिकोनातून चर्चा घडून येईल. त्यातून सकारात्मक निर्णय घ्याल.
३ वर्षांनंतर जुळून आलेली मंगळ आणि युरेनसची युती सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. याकाळात तुम्हाला केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायात वेगाने प्रगती होईल. करिअरचा आलेख उंचावेल. तुमचे व्यक्तिमत्व अधिक खुलून येईल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. समाजात मानसन्मान मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. याकाळात स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखू शकता.
संबंधित बातम्या