मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  mangal gochar : मंगळाची वक्रदृष्टी 'या' तीन राशींवर; डिसेंबर संपेपर्यंत सावध राहावं लागणार

mangal gochar : मंगळाची वक्रदृष्टी 'या' तीन राशींवर; डिसेंबर संपेपर्यंत सावध राहावं लागणार

HT Marathi Desk HT Marathi
Nov 21, 2023 11:59 AM IST

Mangal Gochar effects on rashi : मंगळ ग्रह सध्या वृश्चिक राशीत स्थिरावलेला असून त्याचा थेट फटका तीन राशींना बसणार आहे.

Mangal Gochar
Mangal Gochar

Mangal gochar news in Marathi :  ग्रहांचा राशीबदल ही ज्योतिषशास्त्रातील सतत चालणारी घडामोड आहे. ठराविक महिन्यांनी किंवा वर्षांनी ग्रह राशीबदल करून आपलं वास्तव्य स्थान बदलत असतात. ग्रहांचा सेनापती अशी ओळख असलेला मंगळ ग्रह दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. 

ट्रेंडिंग न्यूज

मंगळानं १६ नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केला होता आणि आता २८ डिसेंबरपर्यंत तो याच राशीत स्थिर असेल. नवा मंगळ असलं तरी तो मंगलकारकच असतो असं नाही. कधी-कधी त्याची वक्रदृष्टीही पडते. मंगळ सध्या वृश्चिक राशीत असल्यानं काही राशींना फायदा होणार आहे, तर काही राशीच्या लोकांना अडणींना सामोरं जावं लागणार आहे. मंगळाच्या गोचरामुळं डिसेंबर महिन्यापर्यंत पुढील राशींना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Shukra gochar : शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन करणार तीन राशींवर धनवर्षाव

कर्क

मंगळाच्या राशी बदलाचा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी तापदायक ठरण्याची शक्यता आहे. तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात प्रचंड दगदग होईल. वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळं जपून राहा. आरोग्याची विशेष काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी टाइमपास टाळा. कर्क राशीच्या लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक खर्च टाळा, नाहीतर आधीच असलेली आर्थिक चणचण तीव्र होईल.

कन्या

मंगळाच्या राशी परिवर्तनामुळं कन्या राशीच्या लोकांचा मानसिक तणाव वाढू शकतो. या काळात वाहन वापरताना काळजी घ्या. वादविवादापासून दूर राहा, अन्यथा विनाकारण कायद्याच्या कचाट्यात अडकाल. आरोग्याकडं दुर्लक्ष करू नका. तुमच्या मानसन्मानास हानी पोहोचू शकते. आदर गमावू शकता. या कालावधीत पैसे वाचवण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी यश येणार नाही.

तूळ

मंगळ वृश्चिक राशीत असताना तूळ राशीच्या लोकांनी वाणीत गोडवा ठेवावा. अनावश्यक भांडणे किंवा वादांपासून दूर राहावं. जोडीदाराची साथ मिळू शकते. मात्र, या काळात तुमच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचा बोजा वाढेल, त्यामुळं मानसिक तणावाचा त्रास होईल. आर्थिक स्थिती यथातथाच असेल. पुढील काळात आर्थिक तंगी घालवायची असेल तर बचतीवर भर द्यावा लागेल.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel