Margashirsha Purnima Rashifal: डिसेंबर महिन्यात वर्षातील शेवटचे पौर्णिमेचे व्रत ठेवले जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेचा दिवस अत्यंत खास आणि शुभ मानला जातो. पंचांग आणि उदय तिथीनुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा १५ डिसेंबर २०२४ रोजी साजरी केली जाईल. मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि चंद्राची पूजा केली जाते. वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेला मृगशिरा नक्षत्र आणि शुभ योग तयार होत आहेत. हे योग अत्यंत शुभ मानले जातात. या दिवशी सूर्यदेव धनु राशीत आणि चंद्र मिथुन राशीत भ्रमण करेल. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी ग्रहांची शुभ स्थिती आणि शुभ योगाची निर्मिती यामुळे पौर्णिमेचा दिवस काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.
कर्क राशीच्या जातकांसाठी वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेचा, अर्थात मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस (१५ डिसंबर २०२४) लाभदायक मानला जातो. या पौर्णिमेला सूर्य आणि चंद्राचे भ्रमण होत असल्याने कर्क राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती सुधारेल. त्यांचे दांपत्य जीवनही मधुर राहील. काही जातक व्यवसायात चांगला नफा कमावू शकतात. कामाच्या बाबतीत तुम्हांला चांगली बातमी मिळू शकते.
वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेचा हा दिवस तूळ राशीच्या जातकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. तूळ राशीच्या जातकांना व्यवसाय क्षेत्रात चांगली डील मिळू शकते. पौर्णिमेला जुळून येत असलेल्या ग्रहस्थितीमुळे आपली आर्थिक स्थिती आणि आरोग्य देखील सुधारू शकते. मुलांच्या बाजूनेही तुम्हाला चांगली, सुखावणारी बातमी मिळेल.
सिंह राशीच्या जातकांसाठीही वर्षाची शेवटची असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस लकी ठरू शकतो. सिंह राशीच्या जातकांना करिअरमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आपल्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाव्या लागतील. तुम्हाला समृद्धी प्राप्त होईल. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जीवनसाथीसोबत सुरू असलेल्या अडचणी हळूहळू संपुष्टात येतील आणि तुमच्या संबंधांत सुधारणा होईल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या