Vastu Tips for home : घरात आरसा कोणत्या ठिकाणी लावावा, कुठे लावू नये? या वास्तु टिप्स जीवनात आणू शकतात आनंद!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vastu Tips for home : घरात आरसा कोणत्या ठिकाणी लावावा, कुठे लावू नये? या वास्तु टिप्स जीवनात आणू शकतात आनंद!

Vastu Tips for home : घरात आरसा कोणत्या ठिकाणी लावावा, कुठे लावू नये? या वास्तु टिप्स जीवनात आणू शकतात आनंद!

Nov 15, 2024 05:59 PM IST

Marathi Vastu Tips: हिंदू धर्मात जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होण्यासाठी वास्तूतील काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक मानले जाते. आरशाशी संबंधित काही वास्तू टिप्स (Marathi Vastu Tips) आयुष्य आनंदी करण्यासाठी फायदेशीर मानल्या जातात.

घरात आरसा कोणत्या ठिकाणी लावावा, कोणत्या ठिकाणी लावू नये? या वास्तु टिप्स जीवनात आणू शकतात आनंद!
घरात आरसा कोणत्या ठिकाणी लावावा, कोणत्या ठिकाणी लावू नये? या वास्तु टिप्स जीवनात आणू शकतात आनंद!

Vastu Tips in Marathi : हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, वास्तुच्या नियमांचे पालन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहते. घरात आरसे ठेवण्यासाठी आणि खास ठिकाणी ठेवण्यासाठी देखील अनेक वास्तुनियम आहेत. असे मानले जाते की, वास्तुशास्त्रानुसार आरसा लावणे किंवा विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. त्याचबरोबर काही गोष्टींची काळजी न घेतल्यास आयुष्यात नकारात्मकता वाढू शकते. चला तर, मग जाणून घेऊया वास्तू सल्लागार आचार्य मुकुल रस्तोगी यांच्याकडून आरशांशी संबंधित काही वास्तू टिप्स...

आरशाशी संबंधित वास्तू टिप्स-

घरातील लॉकरमध्ये ठेवा आरसा

घरातील लॉकरमध्ये आरसा ठेवणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे संपत्तीत वाढ होते.

औषधांच्या ठिकाणी कधीही ठेवू नका आरसा

घरात ज्या ठिकाणी तुम्ही औषधे ठेवता अशा ठिकाणी कधीही आरसा लावू नका. यामुळे औषधांमध्ये वाढ होऊ शकते.

पूजेच्या ठिकाणी ठेवा आरसा

घरातील पूजेच्या ठिकाणी आरसा ठेवणे चांगले मानले जाते.

महिलांनी पर्समध्ये आरसा ठेवणे असते शुभ

महिला आपल्या पर्समध्ये आरसा ठेवू शकतात. यामुळे आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.

नववधूला निरोप देताना कधीही आरसा भेट देऊ नये

याशिवाय नववधूला निरोप घेताना कधीही आरसा भेट देऊ नये. आरसा भेट म्हणून देणे शुभ मानले जात नाही. स्वत: आरसा खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

घराच्या पूर्व किंवा दक्षिण दिशेला आरसा ठेवणे असते शुभ

वास्तुशास्त्रात घराच्या पूर्व किंवा दक्षिण दिशेला आरसा ठेवणे शुभ मानले जाते. त्यामुळे पैशांची आवक वाढते, असे सांगण्यात आले आहे.

तुटलेला, घाणेरडा, अस्पष्ट आरसा कधीही वापरू नका

घाणेरडी, तुटलेली किंवा अस्पष्ट काच कधीही वापरू नका. असा आरसा असेल तर तो घरात ठेवता कामा नये. असे मानले जाते की यामुळे कुटुंबातील सदस्यांना जीवनात अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. अनेक अडचणी निर्माण होतात.

स्वयंपाकघरात, घराच्या पश्चिम व दक्षिणेकडील भिंतीला लावू नये आरसा

स्वयंपाकघर आणि घराच्या पश्चिम किंवा दक्षिणेकडील भिंतीवर आरसे लावू नयेत. यामुळे घरातील कौटुंबिक त्रास आणि नकारात्मकता वाढू शकते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner