Mangal Vakri : येणार सुखाचे दिवस! मंगळ होणार वक्री, 'या' राशींना मिळणार धन, लाभणार सुखसमृद्धी
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mangal Vakri : येणार सुखाचे दिवस! मंगळ होणार वक्री, 'या' राशींना मिळणार धन, लाभणार सुखसमृद्धी

Mangal Vakri : येणार सुखाचे दिवस! मंगळ होणार वक्री, 'या' राशींना मिळणार धन, लाभणार सुखसमृद्धी

Published Jul 18, 2024 10:57 AM IST

Mars Retrograde : ग्रहांचे वक्री होणे आणि मार्गी होणे ही प्रक्रिया सुरूच असते. दरम्यान शनि आणि बुध वक्रीनंतर आता ग्रहांचा सेनापती मंगळसुद्धा आपली उलट चाल चालत वक्री होणार आहे.

मंगळ वक्रीचा राशींवर प्रभाव
मंगळ वक्रीचा राशींवर प्रभाव

वैदिक शास्त्रानुसार, ग्रह निश्चित कालावधीत एका राशीतून निघून दुसऱ्या राशीत प्रवेश करत आपले स्थान बदलत असतात. त्यालाच गोचर असे म्हणतात. प्रामुख्याने ग्रह दोन प्रकारात गोचर करतात. पहिले म्हणजे मार्गी होत. आणि दुसरे वक्री होत. ग्रह मार्गी होतात म्हणजे राशिचक्रात ग्रह सरळ दिशेने प्रवास करतात. आणि ग्रह वक्री होतात म्हणजे राशींमध्ये ग्रह उलट दिशेने प्रवास करतात. ग्रहांची वक्री चाल बहुतांश वेळा राशींसाठी अशुभ समजली जाते. मात्र काहीवेळा ग्रहाची वक्री चाल काही राशींना अत्यंत शुभ लाभदायक ठरते.

ग्रहांचे वक्री होणे आणि मार्गी होणे ही प्रक्रिया सुरूच असते. दरम्यान शनि आणि बुध वक्रीनंतर आता ग्रहांचा सेनापती मंगळसुद्धा आपली उलट चाल चालत वक्री होणार आहे. मंगळच्या वक्री होण्याने राशीचक्रातील काही राशींना प्रचंड लाभ मिळणार आहे. २०२४ च्या अखेर मंगळ वक्री होणार आहे. मंगळच्या या चालीचा फायदा नेमक्या कोणत्या राशींना होणार ते आपण आज जाणून घेऊया.

कन्या

मंगळच्या वक्री होण्याचा लाभ कन्या राशीला मिळणार आहे. हा योग तुमच्या इन्कम आणि लाभ या घरात वक्री होणार आहे. त्यामुळे तुमच्या कमाईत प्रचंड वाढ होईल. पैशांची आवक वाढल्याने आर्थिक स्थिती भक्कम होईल. विविध क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होणार आहे. मुबलक पैसा मिळाल्याने बचत करण्यात यशस्वी व्हाल. सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याने मानसन्मान आणि पद्प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात सकारात्मक बदल घडून येतील. उद्योग विस्तारण्यास मदत होईल. भविष्यकाळात त्यातून प्रचंड आर्थिक फायदा मिळेल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना मंगळच्या वक्री होण्याने लाभ मिळणार आहे. मंगळ या राशीच्या लगन घरात वक्री होणार असल्याने तुम्हाला विशेष लाभ मिळेल. तुमच्या धाडसात आणि पराक्रमात प्रचंड वाढ होईल. नवनवीन लोकांच्या गाठीभेटी होऊन ओळखी होतील. समाजातील मोठ्या आणि प्रभावी लोकांच्या संपर्कात याल. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व आणखी खुलून येईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. आकस्मिक धनलाभ होतील. त्यातून आर्थिक स्थिती सुधारेल. शनीच्या साडेसातीपासून आराम मिळेल. वैवाहिक आयुष्य आणखी बहरेल.

मेष

मंगळच्या उलट चालीचा फायदा मेष राशीच्या लोकांना होणार आहे. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्याने या राशीला दुहेरी लाभ मिळेल. याकाळात तुमच्या घरातील भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. महागड्या वस्तूंची खरेदी कराल. स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखाल. त्यात यशसुद्धा मिळेल. तुमचे व्यक्तिमत्व उठून दिसेल. लोकांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. नोकरीत बदल हवा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल. जमीन खरेदी विक्री, विविध स्थावर मालमत्तेच्या संबंधित अडचणी दूर होतील. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे.

Whats_app_banner