Mangal Vakri Impact On Zodiac Signs 2024 In Marathi : ज्योतिषशास्त्रात ग्रहनक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ग्रहांची हालचाल राशीचक्रातील १२ राशींवर शुभ किंवा अशुभ परिणाम करते. आपल्या कुंडलीत ग्रह कोणत्या स्थानावर आहे त्याप्रमाणे आपल्यावर ग्रह संक्रमणाचा चांगला परिणाम होईल की वाईट परिणाम हे ठरते. प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार राशी आणि नक्षत्र बदलतात. तसेच, प्रत्येक ग्रह वक्री, मार्गीही होऊन आपली चाल बदलतात.
डिसेंबरमध्ये ग्रहांचा सेनापती मंगळ वक्री अवस्थेत येईल म्हणजेच उलट दिशेने हालचाल सुरू करेल. मंगळाच्या उलट्या हालचालीचा म्हणजेच वक्री चालीचा सर्वाधिक परिणाम काही राशींवर होणार आहे. या राशीच्या व्यक्तिंसाठी चांगला काळ सुरू होईल.
पंचांगानुसार मंगळ ग्रह ७ डिसेंबर २०२४, शनिवार रोजी पहाटे ५ वाजून १ मिनिटांनी वक्री होईल आणि मंगळ २४ फेब्रुवारी २०२५, सोमवारी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी मार्गी होईल. मंगळाची वक्री चाल कोण-कोणत्या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल जाणून घ्या.
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाची उलटी हालचाल कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला व्यवसायात प्रगती मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील आणि जुन्या स्त्रोतांमधूनही पैसा येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आपण आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत असाल.
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाची वक्री चाल तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मानसिक समस्या दूर होतील.
मीन राशीच्या लोकांवर वक्री मंगळाचा शुभ परिणाम -
ज्योतिषशास्त्रानुसार वक्री मंगळ मीन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. मंगळाच्या प्रभावाने आनंदात वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला जाणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. आरोग्य चांगले राहील.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे, ही पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)