Mars Retrograde 2024 In Marathi : प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार राशी आणि नक्षत्र बदलतात. तसेच, ग्रह राशीपरिवर्तनासोबतच आपली चालही बदलतात. ग्रहांच्या बदलाचा काही राशीच्या लोकांवर शुभ तर काही राशीच्या लोकांवर अशुभ परिणाम होतो. वर्षाच्या शेवटच्या डिसेंबर महिन्यात २ डिसेंबरला शुक्र ग्रहाने राशी बदलली असून, आता ७ डिसेंबरला मंगळ आपली चाल बदलणार आहे.
ग्रहांचा सेनापती मंगळ ७ डिसेंबरपासून कर्क राशीत वक्री चाल सुरू करेल. वक्री मंगळाचा प्रभाव मेष ते मीन राशीच्या लोकांवर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा मंगळ वक्री होतो तेव्हा काही राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागते. ज्योतिषीय गणनेनुसार मंगळ ज्या राशीत प्रथम, द्वितीय, पाचवा, सातवा, आणि नवव्या भावात भ्रमण करेल त्या राशीसाठी मंगळ हानिकारक सिद्ध होईल.
पंचांगानुसार मंगळ ७ डिसेंबर २०२४, शनिवारी पहाटे ५ वाजून १ मिनिटांनी वक्री होईल आणि सोमवार, २४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी मार्गी होईल.
वक्री मंगळ मेष राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. घरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. कार्यालयातील सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी थोडी सावधगिरी बाळगून काम करावे, अन्यथा नुकसान होऊ शकते. तब्येतीवर लक्ष ठेवा.
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळची वक्री चाल हानिकारक ठरू शकते. मंगळाच्या वक्री हालचाली दरम्यान अशुभ परिणाम जाणवू शकतात. जोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते. नोकरीत अडचणी येऊ शकतात. कामात अडथळे येऊ शकतात.
धनु राशीच्या लोकांना मंगळाच्या वक्री हालचालीमुळे त्रास होऊ शकतो. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. भावंडांमध्ये वाद होऊ शकतात. शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपण मानसिक तणावाचे शिकार होऊ शकतात.
मीन राशीच्या व्यक्तींच्या बोलण्यावर परिणाम होऊ शकतो. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाची कमतरता असू शकते. सरकारी यंत्रणेचे नुकसान होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. वादविवाद टाळा, अन्यथा न्यायालयात जावे लागू शकते.
डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.