Samsaptak Yog : मंगळ शुक्र युती; समसप्तक योगात विवाह योग, होणार आर्थिक प्रगती! तुम्हाला कसा जाईल काळ?
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Samsaptak Yog : मंगळ शुक्र युती; समसप्तक योगात विवाह योग, होणार आर्थिक प्रगती! तुम्हाला कसा जाईल काळ?

Samsaptak Yog : मंगळ शुक्र युती; समसप्तक योगात विवाह योग, होणार आर्थिक प्रगती! तुम्हाला कसा जाईल काळ?

Dec 03, 2024 08:32 AM IST

Samsaptak Yog December 2024 In Marathi : भौतिक सुख, संपत्ती, सौंदर्य आणि वैभवाचा प्रतीक शुक्र आणि पराक्रम, धैर्य, ऊर्जा, आत्मविश्वास, अहंकार आणि क्रोध यांचा कारक मंगळ यांची युती झाल्याने समसप्तक योग निर्माण होत आहे. जाणून घ्या तुमच्या राशीवर कसा परिणाम होईल.

शुक्र मंगळ युती समसप्तक योग २०२४
शुक्र मंगळ युती समसप्तक योग २०२४

Venus And Mars Conjunction In Marathi : भौतिक सुख, संपत्ती, सौंदर्य आणि वैभवाचा प्रतीक शुक्र ग्रहाने २ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश केला आहे. या काळात पराक्रम, धैर्य, ऊर्जा, आत्मविश्वास, अहंकार आणि क्रोध यांचा कारक मंगळ शुक्राकडून सातव्या कर्क राशीत प्रवेश करीत आहे. 

ज्यामुळे मंगळ-शुक्र यांचे परस्पर संबंध निर्माण होत असून, समसप्तक योग निर्माण होत आहे. अशात जाणून घेऊया तुमच्या राशीवर याचा कसा परिणाम होईल.

मेष : 

आर्थिक लाभ होईल, नवीन नातेसंबंध निर्माण होतील, खरेदी कराल, घरात शुभ कार्याचे नियोजन होईल, उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील, विवाह योग राहील, आरोग्यातील अस्थिरता दूर होईल.

वृषभ : 

लांबचा प्रवास घडेल, नवीन नातेसंबंध निर्माण होतील, अतिरिक्त जबाबदाऱ्या अंगावर पडतील, धार्मिक कार्यात रस येईल, खर्चाचा अतिरेक टाळा.

मिथुन : 

आर्थिक दबाव राहील, आरोग्याच्या समस्या असतील, अपघात भय संभवते, चुकीच्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकते, कामाच्या ठिकाणी कलह निर्माण होईल, अधिकाऱ्यांसोबत दुरावा येईल, संयम आवश्यक आहे.

कर्क : 

आर्थिक प्रगती होईल, नवीन कामात गुंतवणूक कराल, जंगम-स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री करू शकतात, कुटुंबात आनंदी वातावरण राहील, प्रेमसंबंधात दुरावा येऊ शकतो.

सिंह :

सिंह राशीची आर्थिक प्रगती होईल, वादग्रस्त बाबींमध्ये यश मिळेल, नवीन जबाबदारी अंगावर पडेल, कामातील व्यत्यय संपेल, नोकरीत बदल होऊ शकतात, आरोग्य चांगले राहील.

कन्या :

कन्या राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग लाभदायक बदलाचा राहील, आर्थिक प्रगती होईल, मानसन्मान मिळेल, मित्रांचे सहकार्य राहील, प्रेम संबंधात गोडवा निर्माण होईल.

तूळ : 

नवे संबंध आणि संपर्क निर्माण होतील, उत्पन्नाचे नवे स्त्रोत असतील, नवीन कामात भांडवली गुंतवणूक करू शकतात, निवास-कामाच्या ठिकाणी बदल होईल, भांडवली गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा.

वृश्चिक :

नवीन नातेसंबंध तयार होतील, कमी अंतराचा प्रवास घडेल, जवळच्या व्यक्तींशी मतभेद होतील, दुरुस्ती आणि आरोग्यावर होणारा खर्च वाढेल, सन्मानात अडथळा येऊ शकतो, सर्व बाबतीत संयम आणि सावधगिरी बाळगा.

धनु : 

अचानक प्रवास होईल, नवीन कामात व्यस्तता वाढेल, वाद होऊ शकतात, आर्थिक नुकसान होऊ शकते, स्वत:ला किंवा कुटुंबातील सदस्याला आरोग्याची समस्या उद्भवू शकते, अपघात किंवा शस्त्रक्रिया शक्य आहे.

मकर : 

कार्यक्षेत्रात चांगले बदल होईल त्यामुळे कामात मन प्रसन्न राहील, मानसन्मान वाढेल, जंगम-स्थावर मालमत्तेची खरेदी करू शकतात, नवीन नातेसंबंध निर्माण होतील, नवीन भागीदारी करू शकतात.

कुंभ : 

कुंभ राशीची रखडलेली कामे होतील, प्रगती होईल, सामाजिक कार्यात व्यस्तता राहील, जंगम मालमत्ता खरेदी कराल, बांधकाम व दुरुस्तीच्या कामावर होणारा खर्च राहील, आरोग्याच्या समस्या दूर होतील, वाद विवाद टाळा.

मीन : 

कमी अंतराचा प्रवास घडेल, नवीन नातेसंबंध व संपर्क निर्माण होतील, उत्पन्नाचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील, दुरुस्ती-बांधकामाच्या कामावर होणारा खर्च वाढेल, मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

Whats_app_banner