वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळने १२ जुलै २०२४ रोजी वृषभ राशीत प्रवेश केला आहे. परंतु याठिकाणी गुरु आधीच उपस्थित आहे. त्यामुळे वृषभ राशीत गुरु मंगळची युती दिसून येईल. हा मंगळ-गुरूचा शुभ संयोग तब्बल ४५ दिवस असणार आहे. पण हा संयोग कुंडलीतील शुभ घरात असेल तरच त्याचा शुभ लाभ राशींना मिळतो. अशुभ स्थानात असेल तर या राशींना प्रचंड त्रास आणि अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान राशीचक्रातील काही राशींना या संयोगाचा नकारात्मक परिणाम सहन करावा लागणार आहे. १२ जुलैपासून येत्या २६ ऑगस्टपर्यंत गुरु-मंगळच्या युतीचा त्रास या राशींना होईल. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया.
शास्त्रानुसार, गुरुला ज्ञान, शिक्षण, धन आणि धर्माचा कारक मानले जाते. शिवाय नऊ ग्रहांपैकी सर्वात शुभ ग्रह म्हणून गुरूला ओळखले जाते. तर दुसरीकडे मंगळला ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखले जाते. मंगळ ग्रह एकनिष्ठपणा, सत्य, निडरपणा, शिस्तप्रिय यांचा कारक आहे. हे दोन्ही ग्रह नवग्रहांमधील महत्वाचे ग्रह आहेत. या दोघांच्या एकत्र येण्याने अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. मात्र काही राशी अशा आहेत, ज्यांना या संयोगाचा अशुभ प्रभाव सहन करावा लागणार आहे. या राशींना आर्थिक, करिअर, वैवाहिक, कौटुंबिक अशा सर्वच बाबतींत अडचणी सहन कराव्या लागणार आहेत. त्यापासून बचावासाठी उपायसुद्धा आम्ही सांगणार आहोत.
गुरु-मंगळ युतीचा नकारात्मक प्रभाव वृषभ राशीच्या लोकांना सहन करावा लागेल. या राशीच्या लोकांना आर्थिक चणचण, आरोग्याच्या तक्रारी, वैवाहिक आयुष्यात जोडीदारासोबत मतभेद, कामामध्ये एकाग्रतेचा अभाव अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.
गुरु-मंगळ युती तूळ राशीच्या लोकांसाठी नुकसानदायक ठरणार आहे. याकाळात तुम्हाला आर्थिक नुकसान, व्यापारात अडचणी, नोकरीत कामे रेंगाळणे, पतीपातींमध्ये वादविवाद अशा विविध समस्या पाहायला मिळणार आहेत. शिवाय स्वास्थ्यही नरमगरम राहील.
कुंभ राशीच्या लोकांनासुद्धा गुरु-मंगळ युती अशुभ लाभाची ठरणार आहे. याकाळात तुम्हाला नोकरीत विविध अडचणी, व्यवसायात आर्थिक हानी, प्रकृतीच्या समस्या, घरात छोटी-छोट्या बाबींवरुन मतभेद अशा समस्या उद्भवणार आहेत.
मीन राशींच्या लोकांसाठी गुरु-मंगळ युती संमिश्र फलदायी असणार आहे. याकाळात तुम्हाला करिअरमध्ये चढ-उतार आणि कौटुंबिक वादविवादाचा सामना करावा लागणार आहे.
गुरु-मंगळ युतीमध्ये मंगळच्या अशुभ प्रभावापासून बचावासाठी मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पूजा करावी. शिवाय लाल रंगांच्या वस्तूंचे दान करावे. असे केल्याने मंगळ ग्रह प्रसन्न होते. दुसरीकडे गुरुचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी व्रत ठेवावे. तसेच पिवळ्या रंगांच्या वस्तूंचे दान करावे. त्यामुळे गुरु ग्रह प्रसन्न होते. सोबतच याकाळात ''ॐ नमो नारायणाय नमः'' या मंत्राचा जप करावा. या ४५ दिवसांच्या कालावधीत दररोज सूर्यनमस्कार करावे. आणि योग-ध्यानसुद्धा आपल्या दिनक्रमात सामील करावे. या सर्व उपायांपासून तुम्हाला गुरु-मंगळच्या अशुभ प्रभावापासून काही प्रमाणात दिलासा देतील.
संबंधित बातम्या