मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mangal Gochar : मंगळ करणार मित्र ग्रह शुक्राच्या राशीत प्रवेश! 'या' राशींना मिळणार पैसा, प्रतिष्ठा, नोकरी

Mangal Gochar : मंगळ करणार मित्र ग्रह शुक्राच्या राशीत प्रवेश! 'या' राशींना मिळणार पैसा, प्रतिष्ठा, नोकरी

Jul 03, 2024 10:21 AM IST

Mars Transit in Taurus : ज्योतिष अभ्यासानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ लवकरच आपली राशी परिवर्तन करणार आहे. मंगळ तब्बल ४५ दिवसांनी आपली राशी बदलणार आहे. मंगळच्या या गोचरचा प्रभाव राशीचक्रातील काही राशींवर पडणार आहे. वाचा या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

मंगळ गोचर
मंगळ गोचर

वैदिकशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. त्या वैशिष्ट्यानुसार ते ग्रह कार्यरत असतात. ग्रहांच्या या गुणधर्मांचा प्रभाव बाराही राशींवर पडत असतो. यानुसारच मंगळ ग्रहाला शौर्य, धाडस, संयम,पराक्रम आणि संपत्तीचा कारक मानले जाते. ज्यावेळी मंगळ ग्रह आपली राशी बदलतो. त्यावेळी या सर्व गुणधर्मांचा प्रभाव त्या-त्या क्षेत्रात दिसून येतो. म्हणूनच मंगळ ग्रहाच्या स्थान बदलला विशेष महत्व आहे. शिवाय मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हणून संबोधले जाते.

ज्योतिषअभ्यासानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ लवकरच आपली राशी परिवर्तन करणार आहे. शास्त्रानुसार मंगळ ४५ दिवसांनी आपली राशी बदलणार आहे. मंगळच्या या हालचालींमधून विविध योग घटित होणार आहेत. दरम्यान सध्या मंगळ मेष राशीत स्थित आहे. आता लवकरच मंगळ आपला मित्र ग्रह असणाऱ्या शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे. अर्थातच मंगळ मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. मंगळच्या या गोचरचा प्रभाव राशीचक्रातील काही राशींवर पडणार आहे. या राशींना त्यातून शुभ फळ प्राप्त होणार आहे. पाहूया या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.

मकर

मंगळच्या वृषभ राशीत प्रवेशाने मकर राशीच्या लोकांना विशेष फायदा मिळणार आहे. कारण मंगळ या राशीच्या पाचव्या घरात भ्रमण करणार आहे. त्यामुळे तुम्हाला मुलांच्या बाबतीत एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. तुमची बौद्धिक तसेच शारीरिक क्षमता वाढणार आहे. तुमच्या अंगातील कलाकौशल्यांना वाव मिळेल. उत्पन्नाचे नवनवीन आर्थिक स्तोत्र निर्माण होतील. आर्थिक आवक वाढल्याने भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. ऐषोरामी आयुष्य जगण्याकडे कल राहील. कलाकारांना चांगले व्यासपीठ प्राप्त होईल. घरामध्ये सुखसमृद्धी येईल.

कुंभ

मंगळच्या वृषभ राशीत होणाऱ्या गोचरचा शुभ लाभ कुंभ राशीच्या लोकांना होणार आहे. मंगळ कुंभ राशीच्या चौथ्या घरातून भ्रमण करत असल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. याकाळात आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. आर्थिक अडचणी दूर होतील. कामातून अपेक्षेपेक्षा अधिक धनलाभ होईल. हातात पैसे आल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. याकाळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास विशेष लाभ मिळणार आहे. स्थावर मालमत्ता खरेदीचा योग जुळून येईल. ही गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.

मेष

मंगळ गोचरचा अत्यंत शुभ प्रभाव मेष राशीच्या लोकांवर पडणार आहे. कारण मंगळ मेष राशीच्या धन आणि वाणी या घरात भ्रमण करत आहे. त्यामुळे याकाळात तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक धनलाभाचे प्रसंग येतील. आर्थिक स्थिती भक्कम होईल. नव्या व्यवसायची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराबद्दल प्रेम आणि आदर वाढेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या वाणीमध्ये सुधारणा होऊन ती अधिक प्रभावशाली बनेल. लोक तुमच्या संवाद कौशल्यावर प्रभावित होऊन तुमच्याकडे आकर्षित होतील.

WhatsApp channel