जोतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह-नक्षत्रांच्या चालींचा शुभ-अशुभ प्रभाव राशीचक्रातील राशींवर पडत असतो. या प्रभावरुन राशींचे भविष्य ठरवले जाते. शास्त्रानुसार मंगळ राशीला विशेष महत्व आहे. मंगळ ग्रहाच्या चालीचासुद्धा प्रचंड मोठा प्रभाव राशींवर दिसून येतो. मंगळ राशीला ग्रहांचा सेनापती म्हणून संबोधले जाते. अशात मंगळ राशीपरिवर्तन करत असेल, तर राशींमध्ये विशेष बदल घडून येतो. सध्या मंगळ गुरुची राशी असणाऱ्या मीन राशीत विराजमान आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच १ एप्रिल रोजी मंगळने मीन राशीत प्रवेश केला होता. दरम्यान आता मंगळ रशिपरिवर्तन करण्याच्या मार्गावर आहे. येत्या १ जूनला मंगळ राशीपरिवर्तन करत राशीचक्रातील पहिली राशी असणाऱ्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रहाच्या या स्थान बदलाने मेष राशीत रुचक राजयोगाची निर्मिती होणार आहे. आणि हा राजयोग काही राशींना अफाट फायदा देणार आहे. १ जूनपासून १२ जुलैपर्यंत मंगळ मेष राशीत विराजमान असणार आहे. मंगळ ग्रहाच्या स्थानबदलाने लाभ होणाऱ्या राशी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया.
मीन राशी सोडून मेष राशीत होत असलेल्या मंगळ ग्रहाच्या संक्रमणाचा फायदा धनु राशीला मिळणार आहे. याकाळात तुम्हाला तुमच्या आयुष्यात शुभ घडामोडी घडलेल्या दिसून येतील. मनासारख्या गोष्टी घडत असल्याने तुमच्यामध्ये एक सकारत्मक ऊर्जा निर्माण होईल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. कोणतेही काम चुटकीसरशी पूर्ण कराल. धार्मिक-अध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल. घरामध्ये धार्मिक कार्याची आखणी कराल. त्याने घरातील वातावरणसुद्धा प्रसन्न होईल. मात्र याकाळात मानसिक आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. शिवाय खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यात अंतर ठेवा. कुटुंबियांना-जोडीदाराला पुरेसा वेळ द्या.
मंगळ ग्रहाच्या मेष राशीत प्रवेशाने कर्क राशीलासुद्धा उत्तम लाभ मिळणार आहे. याकाळात कर्क राशीला नशिबाची प्रचंड साथ लाभणार आहे. एखाद्या महत्वाच्या कामात असलेले अडथळे अचानक दूर होतील. त्यामुळे कामात प्रगती येईल. भूतकाळातील एखाद्या गुंतवणुकीतून आता आर्थिक फायदा मिळेल. अनपेक्षितपणे धनलाभ झाल्याने आनंद द्विगुणित होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल. वरिष्ठांना खुश करण्यात यशस्वी व्हाल. सहकाऱ्यांकडून मानसन्मान मिळेल. तुमच्या प्रत्येक निर्णयात कुटुंबीयांची साथ मिळेल. त्यामुळे नातेसंबंध आणखी मजबूत होतील. घरामध्ये आनंदी वातावरण राहील. व्यवसायाचा चांगला विस्तार होईल.
वृश्चिक राशीसाठी मंगळ ग्रहाचे राशीपरिवर्तन फलदायी ठरणार आहे. अचानक अनपेक्षित मार्गाने धनलाभ होणार आहे. हातात पुरेसा पैसा आल्याने आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कामानिमित्त परदेशी जाण्याचा योग जुळून येईल. या प्रवासातून फायदाच होणार आहे. कोणत्याही गोष्टीत जोडीदाराचा विशेष पाठिंबा असणार आहे. त्यामुळे एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम वाढेल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे घरातील वातावरणसुद्धा खेळीमेळीचे राहील.