जुलै महिन्याला नुकतंच सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विविध ग्रह आपले स्थान बदलत आहेत. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत आहेत. जुलै महिन्याचा दुसरा आठवडासुद्धा काहीसा असाच असणार आहे. जुलै महिन्याचा हा आठवडा मंगळ ग्रहाच्या प्रभावात राहणार आहे. येत्या १२ जुलै २०२४ रोजी मंगळ ग्रह गोचर करणार आहे. मंगळ वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. मात्र याआधीच वृषभ राशीत गुरु ग्रह विराजमान आहेत. अशात मंगळ वृषभ राशीत प्रवेश करत गुरुसोबत शुभ संयोग निर्माण करणार आहे. याचा फायदा काही राशींना मिळणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींवरुन राशींचे भविष्य ठरत असते. या शास्त्रात राशीनुसार भविष्याचा आढावा घेतला जातो. मात्र राशीवरून फक्त भविष्यच सांगितले जात नाही. तर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी आणि लव्ह लाईफबाबतदेखील माहिती देण्यात येते. त्यामुळेच एक एक प्रभावी माध्यम समजले जाते. दरम्यान गुरु-मंगळच्या शुभ संयोगात काही राशींच्या लव्ह लाईफवर अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे. या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत त्याबाबत जाणून घेऊया.
गुरु-मंगळचा शुभ संयोग मेष राशीसाठी फलदायी ठरणार आहे. याकाळात तुमच्या आयुष्यात विविध सुखद घटना घडतील. तुमच्या आनंदात भर पडेल. नवविवाहित जोडप्यांना एकमेकांसोबत मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळेल. एकमेकांबाबत अधिक जाणून घेतल्याने नाते घट्ट व्हायला सुरुवात होईल. वैवाहिक लोकांच्या आयुष्यात सुखसमृद्धी येईल. नात्यातील मतभेद दूर होऊन प्रेम वाढीस लागेल. रिलेशनशिपमध्ये असणारे जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखतील. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकंदरीत तुमची लव्ह लाईफ सकारत्मक राहणार आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु-मंगळ लाभदायक ठरणार आहे. याकाळात तुमचा आनंद द्विगुणित होईल. परस्पर प्रेम वाढेल. जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. त्यामुळे नाते नव्याने बहरेल. शिवाय काही लोक जोडीदाराला देण्यासाठी योजना आखतील. जोडीदारासोबत रोमँटिक डीनर डेटवर जाल. विवाहित जोडप्यांना बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे. पतिपत्नीला घरापासून दूर एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. त्यातून वादविवाद मिटतील.
गुरु-मंगळ योग कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. याकाळात तुम्हाला लव्ह लाईफच्या दृष्टिकोनातून अनेक सुखद अनुभव येतील. तुमच्या आनंदात आणि प्रेमात प्रचंड वाढ होईल. या राशीच्या लोकांच्या लव्ह लाईफमधील प्रेम वाढत जाऊन लव्ह लाईफ बहरणार आहे. लव्ह पार्टनर एकमेकांना अचानक सरप्राईज देण्याचा योग आहे. यातून एकेमकांबाबत प्रेम आणि आदर वाढेल. काही प्रेमीयुगल आज नात्याला लग्नपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करतील. एकमेकांच्या कुटुंबाची परवानगी मिळवण्याचा प्रयत्न कराल. यातून सकारत्मक परिणाम प्राप्त होतील.