Mars Transit New Year 2025 Impact In Marathi : मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमी शुक्रवार, ६ डिसेंबर २०२४ रोजी मंगळ ग्रहाने वक्री गतीने कर्क राशीत भ्रमण केले आहे. २३ जानेवारी २०२५ पर्यंत कर्क राशीतच राहील आणि २३ जानेवारी २०२५ रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल. सोमवार, २४ फेब्रुवारीपर्यंत मंगळ मिथुन राशीत वक्री तर सोमवार, २४ फेब्रुवारीला मंगळ मिथुन राशीत पुन्हा मार्गी प्रवेश करेल. जिथे सोमवार, ७ एप्रिल २०२५ पर्यंत राहणार आहे.
गुरुवार २३ जानेवारी २०२५ दुपारी ४ वाजून ३३ मिनिटांपासून ते सोमवार ७ एप्रिल २०२५ या कालावधीत मिथुन राशीत राहील.
सोमवार ७ एप्रिल २०२५ दुपारी ०४:३३ वाजून ९ मिनिटांनी ते सोमवार ९ जून २०२५ पर्यंत मंगळ ग्रह कर्क राशीत संक्रमण करेल.
सोमवारी ९ जून २०२५ रात्री ९ वाजून ९ मिनिटांपासून ते गुरुवार ३१ जुलै २०२५ सकाळी ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत मंगळाचे सिंह राशीत गोचर राहील.
गुरुवार ३१ जुलै २०२५ सकाळी ६ वाजून ९ मिनिटांपासून ते सोमवार १५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजून १ मिनिटांपर्यंत मंगळ कन्या राशीत गोचर करेल.
सोमवार १५ सप्टेंबर २०२५ रात्री १० वाजून ०१ मिनिटांपासून ते मंगळवार २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजून २४ मिनिटांपर्यंत मंगळ तूळ राशीत राहील.
मंगळवार २८ ऑक्टोबर २०२५ दुपारी ४ वाजून २४ मिनिटांपासून ते रविवारी ७ डिसेंबर २०२५ दुपारी २ वाजून ३७ मिनिटांपर्यंत मंगळाचे संक्रमण वृश्चिक राशीत राहील.
रविवार ७ डिसेंबर २०२५ दुपारी २ वाजून ३७ मिनिटांपासून ते गुरुवार १५ जानेवारी २०२६ रोजी, दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मंगळ धनु राशीत राहील.
मंगळ संक्रमणाचा प्रभाव - नवीन वर्ष २०२५ मध्ये मंगळ एका राशीतून दुसऱ्या राशीत ७ वेळा जाईल. मंगळ संक्रमणाचा प्रभाव काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ असेल. २०२५ मध्ये मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळ लाभदायक ठरेल. हे देखील या दोन्ही राशींचे स्वामी ग्रह आहेत. या राशींच्या जीवनात आर्थिक समृद्धी, करिअरची प्रगती आणि आरोग्यात सुधारणा होईल. याशिवाय कुंभ, मीन, वृषभ, तूळ, धनु, कन्या, मकर आणि सिंह राशीच्या लोकांनाही मंगळ शुभ फळ देईल. मिथुन राशीच्या लोकांना मात्र थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन ही मंगळाची शत्रू राशी आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या