वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अवकाशात नऊ ग्रह कार्यरत आहेत. या नऊ ग्रहांचे प्रत्येकाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. हे ग्रह या वैशिष्ट्यानुसार आपला प्रभाव राशींवर टाकत असतात. ग्रह एका निश्चित कालावधीतच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थान बदल करतात. यालाच ग्रह संक्रमण किंवा गोचर म्हणतात. प्रत्येक महिन्यात कोणते ना कोणते ग्रह गोचर करतच असतात. ग्रह ज्याप्रमाणे राशी परिवर्तन करतात, त्याचप्रमाणे ग्रह नक्षत्र परिवर्तनदेखील करतात. ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनाचादेखील एक निश्चित कालावधी असतो. त्या ठराविक काळातच ग्रह एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतात.
अशा स्थितीत काही ग्रह नक्षत्र परिवर्तन करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ग्रहांनी नक्षत्र बदलले आहे. दरम्यान आता ग्रहांचा सेनापती मंगळसुद्धा एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात गोचर करणार आहे. सध्या मंगळ कृतिका नक्षत्रात विराजमान आहे. परंतु येत्या २७ जुलै २०२४ रोजी तो रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मंगळ तब्बल ४५ दिवसांनी आपली राशी बदलत असतो. तर दुसरीकडे नक्षत्र परिवर्तनासाठी त्याहून निम्मा कालावधी लागतो. मंगळच्या रोहिणी नक्षत्रात गोचरने कोणत्या राशींना लाभ मिळणार ते जाणून घेऊया.
मंगळ ग्रहाच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेशाने मेष राशीच्या लोकांना प्रचंड लाभ मिळणार आहे. कारण मंगळ हा मेष राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे याकाळात तुमच्या व्यक्तिमत्वात चांगली सुधारणा होईल. समाजात तुम्हाला मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे याकाळात पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. महत्वाच्या कामात सहकारी तुम्हाला मदत करतील. त्यामुळे ऑफिसमधील संबंध अधिक मजबूत होतील. उत्पन्नात वाढ होईल. त्यामुळे पैशांची चणचण संपेल. व्यवसायात वेगाने प्रगती झालेली पाहायला मिळेल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन फलदायी ठरणार आहे. याकाळात उद्योग-व्यापारात चांगला नफा मिळेल. मिळकतीचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. व्यापार विस्तारण्यास मदत होईल. नोकरदारवर्गाला कामात गती जाणवेल. तुमच्यावर कामावर सहकारी खुश होतील. वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळेल. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळेल. घरामध्ये आनंदी वातावरण राहील.
मकर राशीच्या लोकांनासुद्धा मंगळच्या रोहिणी नक्षत्रात गोचर करण्याचा फायदा मिळणार आहे. तुमची अडलेली कामे मार्गी लागतील. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. लोकांच्या मनावर तुमची चांगली छाप पडेल. कमाईचे नवे स्तोत्र हाती लागतील. याकाळात समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या गाठीभेटी होतील. त्यांच्या संपर्कात आल्याने लाभच मिळेल. समाजात तुम्हाला मानसन्मान प्रतिष्ठा प्राप्त होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे.
संबंधित बातम्या