वैदिक शास्त्रानुसार ग्रह नेहमीच स्थान बदलत असतात. परंतु ग्रहांच्या या स्थान बदलाचा कालावधी ठरलेला असतो. त्या ठराविक कालावधीतच हे राशी परिवर्तन होत असते. प्रत्येक ग्रहांचा वेगवेगळा कालावधी असतो. ग्रहांच्या या राशी बदलाचा परिणाम प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यावर पडत असतो. त्यामुळेच ग्रहांच्या स्थान बदलावर लक्ष ठेवणे गरजेचे असते.
नवग्रहांपैकी एक ग्रह म्हणजे मंगळ होय. मंगळ ग्रहाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व आहे. मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हणूनही संबोधले जाते. मंगळ सध्या मेष राशीत आहे. मंगळाचा राशिचक्र बदल १ जून रोजी दुपारी ३:५१ वाजता झाला. मंगळ ४२ दिवस मेष राशीत राहील. त्यानंतर, १२ जुलै रोजी संध्याकाळी ७:१२ वाजता मंगळ मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करेल.
मंगळ मेष राशीत असल्यामुळे सर्व १२ राशींवर परिणाम होईल. या योगात राशीचक्रातील काही राशींना विशेष फायदा मिळणार आहे. त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया.
ग्रहांचा सेनापती मंगळच्या मेष राशीत प्रवेशाने मेष राशीचे लोक फायद्यात असणार आहेत. मंगळ ग्रह मेष राशीचा स्वामी ग्रह असल्याने विशेष लाभ होणार आहे. शिवाय मेष राशीत मंगळच्या प्रवेशाने रुचक राजयोग घटित होत आहे. याकाळात तुमच्या मिळकतीत वाढ होईल. अनपेक्षित मार्गाने धनलाभ होतील. हातात पैसा आल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. आयुष्यात असलेल्या अडचणी दूर होतील. आरोग्य उत्तम राहील. सामजिक कार्यात सहभाग घ्याल. त्यामुळे मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमचे व्यक्तीमत्व अधिक उठून दिसेल. महत्वाची कामे विनाअडथळा पूर्ण होतील.
मंगळ ग्रहाचे युवा अवस्थतेतील भ्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. कारण मंगळ ग्रहाचे त्रिकोण राशीत असण्यासोबतच रुचक राजयोग निर्माण होत आहे. याकाळात व्यवसायिकांना एखादी मोठी डील पदरात पडेल. नोकरदार वर्गाला पदोन्नती किंवा पगारवाढीचा योग आहे. अचानक धनलाभ होतील. अनपेक्षितपणे धनलाभ झाल्याने मन उत्साही राहील. एक प्रकारचा आत्मविश्वास जाणवेल. काहींना सरकारी नोकरी मिळण्याचा योग आहे. तर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. नोकरीत बदल हवा असणाऱ्यांना मनासारखा ट्रान्सफर मिळणार आहे.
मंगळच्या युवा अवस्थेतील गोचरने सिंह राशीलासुद्धा फायदा होणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली महत्वाची कामे पूर्ण होतील. घर किंवा वाहन खरेदीचा योग आहे. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. ऐषारामी आयुष्य जगण्याकडे कल राहील. प्रत्येक कार्यात भावंडाची चांगली साथ मिळेल. त्यामुळे मनावरचा अतिरिक्त ताण कमी होईल. मंगळच्या प्रभावाने तुमच्या नेतृत्वगुणात सकारात्मक बदल घडून येईल. समाजात मानसन्मान वाढेल.
संबंधित बातम्या