मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mangal Gochar : ग्रहांचा सेनापती मंगळ निर्माण करणार शुभ संयोग! 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस, होणार भरभराट

Mangal Gochar : ग्रहांचा सेनापती मंगळ निर्माण करणार शुभ संयोग! 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस, होणार भरभराट

Jul 10, 2024 08:01 AM IST

Mangal Gochar 2024 : मंगळने नक्षत्र परिवर्तन करत कृतिका नक्षत्रात प्रवेश केला आहे. यातून शुभ संयोग निर्माण होऊन काही राशींना फायदा होणार आहे.

मंगळ ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन
मंगळ ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ज्याप्रकारे ठराविक कालावधीत राशी परिवर्तन करत असतात. त्याचप्रकारे ग्रह नक्षत्र परिवर्तनसुद्धा करत असतात. ग्रह एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात गोचर करतात. एकूण २७ नक्षत्र स्थित आहेत. या नक्षत्रांमध्ये ग्रहांचे भ्रमण सुरू असते. ग्रह गोचर करत असताना अनेक दुर्मिळ योग निर्माण होतात. या योगांचा प्रभाव राशीचक्रातील बाराही राशींवर पडत असतो. मात्र यामध्ये काही राशींना सकारात्मक तर काहींना नकारात्मक परिणाम सहन करावे लागतात. दरम्यान ग्रहांचा सेनापती मंगळने नक्षत्र परिवर्तन केले आहे.

ज्योतिष अभ्यासात तब्बल नऊ ग्रह आणि सत्तावीस नक्षत्र कार्यरत आहेत. या ग्रहांचे प्रत्येकाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. नवग्रह कोणत्या ना कोणत्या राशीचे स्वामी ग्रह आहेत. शिवाय वेगवेगळ्या गुणधर्मांचे प्रतीक आहेत. त्याप्रमाणे मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हणून संबोधले जाते. मंगळ ग्रह नेतृत्व, एकनिष्ठ, शिस्तबद्धपणा या गुणधर्मांचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे मंगळ गोचर अत्यंत महत्वाचे असते. मंगळ ४५ दिवसांत आपली राशी बदलतो. त्याचप्रमाणे मंगळ नक्षत्रसुद्धा बदलत असतो. सध्या मंगळने नक्षत्र परिवर्तन करत कृतिका नक्षत्रात प्रवेश केला आहे. यातून शुभ संयोग निर्माण होऊन काही राशींना फायदा होणार आहे.

वृषभ

मंगळचे कृतिका नक्षत्रात गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. याकाळात तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील. वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीची इच्छा पूर्ण होईल. करिअरमध्ये सकारात्मक बदल घडून येतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसाय-उद्योगात चांगला आर्थिक नफा मिळेल. तुमच्यातील धडाडीपणा आणि धाडशीवृत्तीत वाढ होईल. मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक आवक वाढेल. त्यामुळे बचत करण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना मंगळ गोचर फलदायी ठरणार आहे. याकाळात तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. धन संचयात भाग्याची साथ मिळेल. शिवाय मिळकतीचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. घरात भौतिक सुखाच्या वस्तूंची खरेदी होईल. भविष्याच्यादृष्टीने बचत करण्यात यशस्वी व्हाल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. मूड अगदी रोमँटिक राहील. जुनाट दुखण्यांपासून मुक्ती मिळेल. आरोग्य उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. कामाप्रती तुमची निष्ठा पाहून वरिष्ठ एखादी मोठी जबाबदारी सोपविण्याची शक्यता आहे.

कन्या

मंगळ गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. याकाळात तुम्हाला वेळोवेळो धनलाभ होईल. त्यातून आर्थिक स्थिती भक्कम होईल. नोकरीत प्रगतीच्या विविध संधी उपलब्ध होतील. याकाळात नवीन नाती जोडली जातील. तसचे मंगळ गोचर दरम्यान कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदाच होईल. तुमच्या कार्यपद्धतीत सुधारणा होईल. कामात गती निर्माण होईल. अडलेली कामे पूर्णत्वास जातील. व्यवसाय आणि व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. व्यवसाचा विस्तार करण्यासाठी हा काळ उत्तम आहे.

WhatsApp channel