वैदिक शास्त्रानुसार, मंगळला ग्रहांचा सेनापती असे संबोधले जाते. मंगळ ग्रहाचा प्रचंड प्रभाव राशींवर पडत असतो. त्यामुळेच मंगळच्या हालचाली ज्योतिषीय अभ्यासात अत्यंत महत्वाच्या असतात. मंगळ ज्या राशींवर शुभ प्रभाव टाकतो त्यांचे नशीब चमकते. मात्र याउलट मंगळ ज्या राशींवर अशुभ प्रभाव टाकतो त्यांच्या आयुष्यात उलथापालथ होते. त्या लोकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. येत्या दोन दिवसात मंगळ राशी परिवर्तन करत गोचर करणार आहे. मात्र मंगळ गोचरचा काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. पाहूया त्या राशी कोणत्या आहेत.
मंगळला ग्रहांचा सेनापती म्हणून संबोधले जाते. मंगळ एका ठराविक कालावधीत आपले स्थान बदलत असतो. शुक्रवार १२ जुलै २०२४ रोजी मंगळ आपली राशी बदलणार आहे. याकाळात मंगळ वृषभ राशीत गोचर करणार आहे. १२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी मंगळ गोचर करेल. मंगळ गोचरचा काही राशींना मात्र त्रास सहन करावा लागणार आहे. याकाळात त्या राशींना विविध अडचणींचा सामना करावा लागेल.
मिथुन राशीच्या लोकांना मंगळ गोचरचा नकारात्मक प्रभाव सहन करावा लागणार आहे. याकाळात तुम्हाला अनावश्यक खर्च अनावश्यक पळापळसारखी स्थिती निर्माण होईल. आर्थिक आवक घटेल. मिळकतीपेक्षा खर्च अधिक होईल. अशा स्थितीत कोणाकडूनही कर्ज घेणे टाळा. अथवा डोक्यावर कर्जाचा डोंगर होण्याची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. नाहीतर पोटाचे विकार, चर्म रोग त्रास देण्याची शक्यता आहे. शिवाय आपल्या खानपानाच्या सवयींकडे लक्ष द्या. एकंदरीत याकाळात अडचणी उद्भवणार आहेत.
कर्क राशीच्या लोकांनासुद्धा मंगळ गोचरचा काहीसा त्रास पाहायला मिळणार आहे. याकाळात वैवाहिक आयुष्यात अनेक चढ उतार पाहायला मिळतील. जोडीदारासोबत नातेसंबंध बिघडतील. विनाकारण वाद, भांडण होणाऱ्या घटना घडतील. त्यामुळे बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. अनिद्रा आणि ताणतणाव जाणवेल. त्यातून मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. त्यामुळे योग-प्राणायाम यांचा आधार घेतल्यास फायदा होईल. आर्थिक चणचण भासेल. व्यवसायिकांना आर्थिक नुकसान करणाऱ्या गोष्टी घडतील.
मंगळ गोचर धनु राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. याकाळात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. मिळकत तर होईल मात्र त्यापेक्षा अधिक खर्चसुद्धा होईल. अशा स्थितीत तुम्ही केलेली बचत संपुष्ठात येऊ शकते. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळणे सोयीचे ठरेल. याकाळात कोणालाही पैसे उधारीवर देणे टाळा, अथवा पैसे अडकू शकतात. प्रकृतीची काळजी घ्या. खासकरून डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल. नोकरी किंवा उद्योग व्यवसायात केलेला निष्काळजीपणा नुकसानदायक ठरू शकतो.
संबंधित बातम्या