ग्रह एका ठराविक वेळेनंतर गोचर करत असतात. यामध्ये ग्रह एका राशीतून निघून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. प्रत्येक ग्रहाच्या गोचरचा एक निश्चित कालावधी असतो. त्या कालावधीतच हे ग्रह राशी परिवर्तन करतात. काही ग्रह कमी वेळेत गोचर करतात तर काही ग्रह बराच कालावधी घेतात. दम्यान ग्रहांचा सेनापती मंगळ आता गोचर करण्याच्या मार्गावर आहे. मंगळ ग्रह गोचर करण्यासाठी जास्त कालावधी घेतो. मंगळ तब्बल ४५ दिवसांत राशी परिवर्तन करत असतो.
येत्या १२ जुलै २०२४ रोजी मंगळ आपली राशी बदलणार आहे. मंगळ शुक्रवारी सायंकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर तब्बल ४५ दिवसांनी म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी मंगळ वृषभ राशीतून निघून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मंगळच्या गोचरचा कालावधी ४५ दिवसांचा असणार आहे. या निश्चित काळातच मंगळ राशीपरिवर्तन करत असतो. दरम्यान मंगळच्या या गोचरचा शुभ लाभ काही राशींना मिळणार आहे. या राशी ४५ दिवस मजेत असणार आहेत. त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूया.
सिंह राशीच्या लोकांना मंगळ गोचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या काही लोकांना सरकारी नोकरी मिळण्याचा योग आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. अचानक धनलाभ होतील. मुबलक पैसे आल्याने सुखसुविधांमध्ये वाढ होईल. याकाळात व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होईल. नोकरदार वर्गाला कष्टाचे फळ मिळेल. कामाच्या जोरावर प्रमोशन किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. कलाकारांना कलाक्षेत्रात उत्तम संधी मिळेल. मोठे व्यासपीठ प्राप्त होईल. घरात सुखसमृद्धी नांदेल.
कन्या राशीच्या लोकांना मंगळ गोचरचा विशेष लाभ मिळणार आहे. तब्बल ४५ दिवस या राशी सुखात असणार आहेत. याकाळात तुम्हाला आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. आकस्मिक धनलाभ होईल. आर्थिक आवक वाढल्याने आर्थिक स्थिती भक्कम होईल. शिवाय या काळात कोणत्याही क्षेत्रात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. विदेशी व्यापारात गुंतवणूक केलेल्यांना प्रचंड लाभ मिळेल. व्यवसायिकांना व्यवसाय विस्तारण्याची संधी मिळेल. नोकरदार वर्गासाठी हा काळ सुखावणारा आहे. तुम्हाला ऑफिसमध्ये मानसन्मान आणि पदप्रतिष्ठा मिळेल.
मंगळ गोचर मीन राशीसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. याकाळात तुमच्यात संयम आणि पराक्रम वृत्ती वाढेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. सहकाऱ्यांकडून मानसन्मान लाभेल. या राशीच्या लोकांना अनपेक्षित मार्गाने धनलाभ होतील. अचानक पैसा हाती आल्याने मन आनंदी होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. सरकारी कामात यश मिळेल. शिवाय एखादे सरकारी काम पदरात पडेल. व्यवसायिकांची वेगाने प्रगती होईल. स्थावर मालमत्ता खरेदीची इच्छा पूर्ण होईल. नवा व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टकोनातून हा काळ उत्तम आहे.
संबंधित बातम्या