Mangal Rashi Parivartan : १ जूनला मंगळ करणार मेष राशीत प्रवेश! चिंता संपणार, भाग्य उजळणार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mangal Rashi Parivartan : १ जूनला मंगळ करणार मेष राशीत प्रवेश! चिंता संपणार, भाग्य उजळणार

Mangal Rashi Parivartan : १ जूनला मंगळ करणार मेष राशीत प्रवेश! चिंता संपणार, भाग्य उजळणार

Published May 24, 2024 02:13 PM IST

Mangal Rashi Parivartan : जून महिन्यात १ तारखेला मंगळ ग्रह राशीपरिवर्तन करत मेष राशीत संक्रमण करणार आहे. या संक्रमणाचा काही राशींवर शुभ प्रभाव पडणार असून, या राशी कोणत्या आहेत जाणून घ्या.

मंगळ गोचर, राशींवर प्रभाव
मंगळ गोचर, राशींवर प्रभाव

जोतिष शास्त्रानुसार मंगळ ग्रहाला विशेष महत्व आहे. मंगळ हा ऊर्जा, जमीन, सामर्थ्य, धैर्य, पराक्रम आणि पराक्रमाचा कारक मानला जातो. मंगळ ग्रहाच्या हालचालींचा राशींवर अत्यंत महत्वाचा प्रभाव पडतो. मंगळ ग्रहाला ग्रहांचा योद्धा म्हणून देखील संबोधले जाते. येत्या काही दिवसात म्हणजेच १ जून २०२४ रोजी मंगळ राशीपरिवर्तन करत एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करणार आहे. 

शास्त्रानुसार यंदा मंगळ ग्रहाचे राशीपरिवर्तन अत्यंत खास असणार आहे. कारण मंगळ त्याचीच राशी असणाऱ्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीत प्रवेश केल्याने मंगळचा शुभ प्रभाव दुपट्टीने वाढणार आहे. आणि याचा लाभ राशीचक्रातील काही राशींना होणार आहे. मंगळ ग्रह ऊर्जा आणि उत्साहाचा प्रसारित ग्रह असून, मंगळचे हे संक्रमण काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घ्या.

मेष

१ जून २०२४ रोजी होणारे मंगळ संक्रमण मेष राशीसाठी अतिशय शुभ असणार आहे. मंगळ संक्रमणाने या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत भाग्याची साथ लाभणार आहे. नोकरीमध्ये अगदी कमी काळात यशाचा मोठा शिखर सर करणार आहात. नव्याने सुरु केलेल्या व्यवस्याचा उत्तम जम बसणार आहे. तर व्यवसायिकांना व्यवसाय विस्ताराच्या नवनव्या संधी उपलब्ध होणार आहेत.पैसा मिळवण्याचे नवे दरवाजे खुले होणार आहेत.जोडीदारासोबत भावनिक संवाद होऊन नातेसंबंध सुधारणार आहेत.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांनासुद्धा मंगळ ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा फायदा होणार आहे. मंगळच्या मेष राशीत प्रवेश करण्याने मिथुन राशीमध्ये सकारत्मक बदल दिसून येणार आहे. या प्रभावात तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. हातात अचानक पैसा येईल. त्यामुळे मनाला समाधान लाभेल. अनेक दिवसांपासून रखडलेली महत्वाची कामे पूर्णत्वास जातील. बेरोजगारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. या सकारत्मक बदलांमुळे तुमच्या घरातील वातावरणसुद्धा उत्तम असणार आहे. जोडीदाराला आवश्यक त्या ठिकाणी समजून घेतल्यास गृहसौख्य लाभेल.

कर्क

मेष आणि मिथुन राशीप्रमाणेच कर्क राशीसाठीसुद्धा मंगळ ग्रहाचे संक्रमण लाभदायक असणार आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती करणारी घडामोड घडणार आहे. अनेक दिवसांपासुन एखाद्या गोष्टीत करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. व्यवसायिकांना व्यवसायात ठरवलेले लक्ष पूर्ण करण्यास हा काळ उत्तम आहे. स्पर्धा परीक्षेत प्रयत्न करत असलेल्या लोकांना सरकारी नोकरीचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. धनलाभसुद्धा उत्तम होणार आहे.

Whats_app_banner