वैदिक शास्त्रात शुक्र ग्रहाला धन, वैभव, सुख-समृद्धीचा देवता म्हटले जाते. येत्या १९ मे २०२४ रोजी शुक्र राशीचक्रातील दुसरी राशी वृषभ राशीमध्ये संक्रमण करणार आहे. त्यामुळे काही राशींना धनलाभाचा योग जुळून येणार आहे. शुक्राने वृषभ राशीत प्रवेश केल्यानंतर मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. शास्त्रानुसार मालव्य राजयोग अतिशय शुभ समजला जातो.
हा राजयोग पंचमहापुरुष राजयोगांपैकी एक समजला जातो. या राजयोगामुळे धन, सुख-समृद्धी आणि संपत्तीत प्रचंड वाढ होते. तसेच हा राजयोग लाभलेल्या लोकांची सर्व कामे विना अडथळा पूर्ण होतात. करिअर यशाच्या शिखरावर पोहोचते. यंदाच्या या मालव्य राजयोगाचा फायदा कोणत्या राशींना मिळणार याबाबत आपण जाणून घेऊया.
१९ मे २०२४ रोजी शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणाने जो मालव्य राजयोग जुळून येत आहे, त्याचा मोठा फायदा वृषभ राशीला होणार आहे. मालव्य राजयोगाच्या प्रभावाने वृषभ राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात मनासारखे किंवा त्यातून अधिक यश प्राप्त होईल. हातात घेतेलेले प्रत्येक कार्य यशस्वी ठरेल. तसेच अनेक दिवसांपासून रखडलेली कामे अचानक पूर्ण होतील. अनपेक्षित मार्गाने धनलाभ होईल. एखादा व्यवसाय व्यापार ठप्प झाला असेल तर त्याला पुन्हा गती प्राप्त होईल. आणि त्यातून मोठा आर्थिक फायदासुद्धा होईल. मालव्य राजयोगामुळे अनेक दिवसांपासून विवाहात अडचण येत असलेल्या लोकांना विवाह जुळण्यास मदत होईल. एकंदरीत वृषभ राशीसाठी हा राजयोग अत्यंत फलदायी ठरणार आहे.
अतिशय शुभ अशा मालव्य राजयोगाचा फायदा कन्या राशीच्या लोकांनासुद्धा मिळणार आहे. या राशीच्या लोकांसाठी मिळकतीचे नवे मार्ग खुले होतील. त्यातून मोठा आर्थिक फायदा लाभेल. तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. तुमच्या मुलांकडून आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळू शकतात. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत नातेसंबंध सुधारतील जुने मतभेद नाहीसे होतील. आर्थिक संपत्तीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. तुम्ही कार्यरत असलेल्या प्रत्येक क्षेत्रात मनासारखे यश लाभेल. उद्योग-व्यवयसाचा विस्तार होईल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ आणि कन्या राशीप्रमाणे कुंभ राशीलासुद्धा मालव्य राजयोग फायदेशीर ठरणार आहे. या योगामुळे कुंभ राशीतील लोकांच्या सुख समृद्धीत वाढ होईल. हा योग कुंभ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. तुम्हाला उद्योग व्यवसायात अतिशय फायदा मिळून धनलाभ होईल. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून दुपट्ट पैसा मिळेल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. स्थावर मालमत्तेत वाढ होईल. कमाईचे नवे मार्ग उपलब्ध होतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. घरातील भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. समाजात तुमचे व्यक्तिमत्व आणखी उठून दिसेल. तुमच्या सामंजस्य दृष्टीकोनातून लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.