Makar Rashi Yearly Horoscope 2025 : मकर राशीच्या लोकांना नवीन वर्ष कसं जाईल? वाचा मकर राशीचं वार्षिक भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar Rashi Yearly Horoscope 2025 : मकर राशीच्या लोकांना नवीन वर्ष कसं जाईल? वाचा मकर राशीचं वार्षिक भविष्य

Makar Rashi Yearly Horoscope 2025 : मकर राशीच्या लोकांना नवीन वर्ष कसं जाईल? वाचा मकर राशीचं वार्षिक भविष्य

HT Marathi Desk HT Marathi
Dec 19, 2024 06:06 PM IST

Makar Varshik Rashi Bhavishya 2025 : मकर राशीसाठी २०२५ हे वर्ष कसं जाईल? आर्थिक, करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत या राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय घडामोडी घडतील? जाणून घ्या मकर राशीचे वार्षिक राशीभविष्य.

Makar Rashi Yearly Horoscope 2025 : मकर वार्षिक राशीभविष्य २०२५
Makar Rashi Yearly Horoscope 2025 : मकर वार्षिक राशीभविष्य २०२५

Capricorn Yearly Rashi Bhavishya Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष सामान्य असू शकतं आणि त्यांना अनेक बाबतीत अपेक्षित परिणाम मिळतील. विशेषतः मार्च २०२५ नंतर मकर राशीच्या लोकांचं नशीब बदलेल.

शनीची साडेसाती

मार्च २०२५ नंतर मकर राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती संपेल. दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या सर्व समस्या सुटतील आणि तुम्हाला चांगली फलप्राप्ती होईल.

सुख समृद्धी

जमीन किंवा घर खरेदीशी संबंधित तुमची स्वप्नं २०२५ मध्ये शनीच्या साडेसातीच्या नंतर पूर्ण होऊ शकतात. काही काळापासून संपत्तीशी संबंधित  वादही मिटतील. तुम्ही मार्च २०२५ नंतर नवीन कार घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. यावेळी तुम्ही तुमच्या आवडीची कार खरेदी करू शकता.

कुटुंब

२०२५ मध्ये तुम्हाला कौटुंबिक बाबींमध्ये यश मिळेल. शनिचे द्वितीय भावात होणारे संक्रमण तुम्हाला लाभ देईल पण मे नंतर राहू काही प्रमाणात अडचणी निर्माण करेल. राहुमुळं तुमची जुनी दुखणी पुन्हा ताजी होतील. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीनं २०२५ हे वर्ष नातेसंबंध मजबूत करेल. मेपूर्वी लग्न करण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळू शकते.

आर्थिक पैलू

२०२५ हे वर्ष तुम्हाला आर्थिकदृष्ट्या चांगलं जाईल. कष्टाच्या तुलनेत तुम्हाला जास्त चांगलं फळ मिळेल. गुरूच्या कृपेमुळं मे पर्यंत तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो परंतु मे नंतर शनि आणि राहूच्या प्रभावामुळं तुमच्या बचतीवर परिणाम होईल. लक्षात ठेवा, सुज्ञ निर्णय घेऊन तुम्ही तुमची बचत राखू शकता.

नोकरी

मार्च २०२५ नंतर तुम्ही चांगल्या परिणामांची अपेक्षा केली पाहिजे. तुम्हाला तुमची नोकरी बदलायची असेल तर मार्चनंतर निर्णय घ्या. मार्च ते मे दरम्यान तुम्ही तुमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवाल. तुमची कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली होईल. मे नंतर, चांगले परिणाम मिळविण्यासाठी कार्यालयातील सहकाऱ्यांशी संबंध दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करा.

व्यवसाय

२०२५ हे वर्ष तुम्हाला व्यवसायात गेल्या वर्षीपेक्षा अधिक फायदेशीर परिणाम देणार आहे. मार्चपर्यंत शनिमुळं तुम्हाला व्यवसायात काही कमजोरी दिसून येईल, परंतु मार्चनंतर शनि तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. मे नंतर बुधाच्या संक्रमणाचाही तुम्हाला फायदा होईल. एकंदरीत मार्च नंतरचा काळ शुभ आहे.

शिक्षण

२०२५ मध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार शिक्षणात यश मिळेल, परंतु पाचव्या घरात गुरु तुम्हाला मे नंतर उच्च शिक्षण देऊ शकेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ वरदान ठरू शकतो. निकाल तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. या वर्षी बुधाचं संक्रमणही तुमच्या अनुकूल राहील. त्यामुळं तुमची कामगिरी सुधारेल.

आरोग्य

मार्च २०२५ नंतर आरोग्याच्या समस्या सुटतील. तब्येत सुधारेल. मे नंतर राहूच्या प्रभावाखाली तुमच्या खाण्याच्या सवयी बिघडतील आणि तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. मे पासून तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमची दिनचर्या आणि आहार सुधारूनच तुम्ही ही समस्या टाळू शकता.

 

(डिस्क्लेमर : वरील माहिती ज्योतिषशास्त्राच्या आधारे देण्यात आली आहे. ती पूर्ण सत्य व योग्य असेलच असं नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner