Makar Rashi Career : मकर राशीच्या लोकांना या प्रकारच्या नोकरी आणि उद्योगात हमखास यश मिळते, जाणून घ्या-makar rashi career predictions according to rashi here are the details capricorn makar rashi career horoscope in marathi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar Rashi Career : मकर राशीच्या लोकांना या प्रकारच्या नोकरी आणि उद्योगात हमखास यश मिळते, जाणून घ्या

Makar Rashi Career : मकर राशीच्या लोकांना या प्रकारच्या नोकरी आणि उद्योगात हमखास यश मिळते, जाणून घ्या

Jan 21, 2024 05:39 PM IST

Makar Rashi Career Predictions : राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया मकर राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.

Makar Rashi Career
Makar Rashi Career

Zodiac Signs and Career : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. त्या राशीचे काही गुणधर्म असतात, ते संबंधित व्यक्तीमध्ये आढळतात. त्या स्वभावधर्मानुसार त्या-त्या व्यक्तीचं जीवन चालतं, असं मानलं जातं. राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया मकर (Capricorn) राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.े

मकर राशीत येणारी नक्षत्रे

मकर राशी ही स्त्रीप्रधान समसंख्या असलेली वैश्यवर्णाची आणि चर राशी म्हणून मकर राशीचा लौकीक आहे. ही राशी शनी ग्रह स्वामी असून या राशीत रविचे नक्षत्र उत्तराषाढा तीन चरण चंद्राचे श्रवणात चार चरण आणि मंगळाचे धनिष्ठा नक्षत्रात दोन चरण येते. यामुळे मकर राशीवर शनि आणि चंद्राचा प्रभाव खूप असून त्याचबरोबर रवि आणि त्यानंतर मंगळाचा प्रभाव दिसून येतो. शनि राशीचा स्वामी असल्यामुळे कर्मस्थानावर अंमल असणारी राशी आहे. 

मकर राशी अत्यंत सोशिक, गंभीर विचारसरणी असणारी दिसते. त्याचप्रमाणे संकुचितपणा असे दुर्गुणही दिसून येतात. अत्यंत गंभीर विचारसरणी असे या राशीचे वैशिष्ट्ये पाहावयास मिळते. कागद, कापड, भाषण, पुस्तक प्रकाशन किंवा विक्री, जज, कारकून, पेट्रोलपंप, फॅक्टरी, फिल्मइंडस्ट्री, प्रवचनकार, वगैरे ठिकाणी आढळतात.सरकारी, निमसरकारी क्षेत्रात या व्यक्ती करीअर करतांना आढळतात. प्रशासकीय कामात किंवा राजकारणात ही या व्यक्ती आढळून येतात.

मकर राशींच्या व्यक्तींचा स्वभाव आणि गुणधर्म

मकर राशीत संकटाशी टक्कर देऊन आपले ध्येय गाठण्याची ताकद आहे. चिकाटी आणि सोशिकपणा हे सामर्थ्य या राशीत पाहावयास मिळते. भरपूर मेहनत करुन सुध्दा फळ मात्र फारच कमी प्रमाणात मिळते. यातून चिडखोर वृत्ती, दुसऱ्याला नावे ठेवण्याची वृत्ती दिसून येते. नैराश्य वैताग यामुळे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. 

मकर राशीच्या व्यक्ती एकतर श्रीमंत असतात किंवा मग कसेबसे जीवन व्यतीत करतात. स्वभाव भांडखोर असतो. लोभी वृत्तीमुळे चांगल्या संधीचा फायदा यांना मिळत नाही. जमाखर्च ठेवण्याची आवड बाळगणारा असतो. प्रवासाची आवड असते. विद्या व बुद्धिमत्ता कमी असली तरी परिश्रम घेणारा असतो. चंचल स्वभाव असतो. पर्यटन स्थळ, डोंगर, वने यामध्ये भटकंती करण्याची आणि राहण्याची आवड असते. विनयशील व उदारपणा कमीच दिसून येतो. याप्रमाणे मकर राशीचे वैशिष्ट्ये सर्व साधारणपणे दिसून येते.

मकर राशींच्या व्यक्तींसाठी अनुकुल कार्यक्षेत्र

मकर राशी ही शनिच्या अधिपत्याखाली असणारी राशी असून सेवावृत्ती हा शनिचा गुणधर्म असून चिकाटी, सातत्य परिश्रम घेण्याची वृत्ती या गुणांचा प्रभाव मकर राशीत दिसून येतो. साहजिकच कारखान्यात काम करणारे अत्याधुनिक उपकरण, यंत्र निर्मिती करणाऱ्या क्षेत्रात मकर व्यक्ती दिसून येतात. दिलेली कामे तेवढ्याच मेहनतीने करणे हा गुणधर्म असल्याने बांधकाम क्षेत्र, सिमेंट उद्योग, स्टील निर्मिती, खाण उद्योग या क्षेत्राशी या व्यक्तींचा संबंध दिसून येतो. प्रिन्टींग उद्योग, प्रकाशन संस्था यासारख्या उद्योगातही मकर राशीच्या व्यक्ती आपले करीअर करतांना आढळतात. पादत्राणे, चामड्याच्या वस्तू शेतीची अवजारे यांची निर्मिती यासारख्या कारखान दारीत मकर व्यक्ती आपले वर्चस्व प्रस्थापित करतांना दिसतात. 

मकर राशीत चंद्राचे प्राबल्य असल्यामुळे पेट्रोलियम उद्योग, पेट्रोलपंप, डेअरी उद्योगक्षेत्रात प्रामाणिक पणे मेहनत करताना दिसतात. व्यवसाय असो की नोकरी या दोन्ही मध्ये मकर व्यक्तींना अपेक्षेपेक्षा कमीच यश मिळते हे गृहीत धरुनच आपले कार्य चालू ठेवावे. काम करतांना पुर्ण मेहनत घ्या म्हणजे बऱ्यापैकी यशस्वी होऊ शकाल. मकर राशीत शनि चंद्राच्या खालोखाल रविचा प्रभाव असल्यामुळे सरकारी निमसरकारी क्षेत्रात या व्यक्ती करीअर करतांना दिसतात. प्रशासकीय कामात किंवा राजकारणात ही या व्यक्ती आढळून येतात. औषध निर्मिती, सोन्याचा व्यापार या क्षेत्रातही मकर व्यक्तींना करीअर करण्याची चांगली संधी प्राप्त होऊ शकते. सरकारी एजन्सी घेऊन व्यवसाय करणे या व्यक्तींना फायदेशीर ठरते. 

मकर राशीत मंगळाचे प्राबल्य थोड्या प्रमाणात आहे. कारण मंगळाचे धनिष्ठा नक्षत्र मकर राशीत दोन चरणात असल्याने बांधकाम व्यवसायासंबंधीत किंवा जमिनीच्या व्यवसायात सुध्दा मकर राशीच्या व्यक्ती करीअर करताना दिसून येतात. घर, जमीन जुमला इत्यादिच्या व्यवहारात काही प्रमाणात मकर राशींना यश मिळू शकते. तसेच सुरक्षा संबंधीत पोलीस दल मिलीटरी या क्षेत्रातसुध्दा मकर राशीच्या व्यक्ती आढळून येतात. कारखान्यात विशिष्ट प्रकारची वस्तु निर्मिती करणे अशी कामे मकर राशीच्या व्यक्ती चांगल्या प्रकारे करु शकतात. पोलीस दल मिलीटरी या क्षेत्रात सुध्दा मकर राशीच्या व्यक्ती आढळून येतात. मकर ही शनिच्या मालकीची राशी असल्यामुळे सेवा उद्योगात साधारणपणे या व्यक्तींचा दबदबा दिसून येतो. मकर राशीच्या व्यक्ती व्यवसाय असो किंवा नोकरी अशा दोन्ही क्षेत्रात आपले करीअर करताना दिसुन येतात.