Makar kumbh meen rashi today मकर राशीचे लोक स्वप्नांच्या दुनियेत वावरतील! वाचा तिन्ही राशींचे भविष्य-makar kumbh meen rashi today 9 january 2024 capricon aquarius pisces zodiac signs prediction ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today मकर राशीचे लोक स्वप्नांच्या दुनियेत वावरतील! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Makar kumbh meen rashi today मकर राशीचे लोक स्वप्नांच्या दुनियेत वावरतील! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Jan 09, 2024 09:41 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 9 january 2024 : मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल नववर्षाचा दुसरा मंगळवार ? वाचा आजचे राशीभविष्य!

Capricon, Aquarius, Pisces
Capricon, Aquarius, Pisces

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज ९ जानेवारी रोजी, चंद्र राहु-नेपच्युन बरोबर नवमपंचम योग करणार आहे. आजच्या दिवसावर बुधाचा प्रभाव राहील. कोणावर होणार मंगळाची कृपादृष्टी! कसा असेल मंगळवार! वाचा राशीभविष्य!

मकरः 

आजचं चंद्रभ्रमण पाहता मुलांच्या प्रगतीची चिंता वाटेल. पूर्वी केलेल्या कामाची मात्र पावती मिळेल. मानमरातब मिळेल. जुने मित्र भेटतील. आर्थिक पातळी वरील प्रश्न चुटकीसरशी सोडवाल. तरुणांना योग्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाल्यामुळे स्वप्नांच्या दुनियेतच वावराल. स्वतःसाठी चोखंदळपणे खरेदी कराल. काही महत्त्वाचे निर्णय अविचारपणे घेतले जाण्याची शक्यता आहे. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. साथीदाराचे सहकार्य लाभल्या मुळे मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढीस लागेल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीना प्रगती कारक आहे. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. नोकरी व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासाची प्रगती उत्तम राहील. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०१, ०८.

कुंभः 

आज बुधाच्या नक्षत्रातुन होणार चंद्रगोचर पाहता आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. त्यामध्ये चैनीच्या वस्तूंचा जास्त समावेश असेल. जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल. घरामध्ये मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही आनंदी वातावरण निर्माण होईल. वारसा हक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. मनात उर्जा आणि उत्साह वाढेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. सर्वच स्तरातील नाते संबंधात स्नेह निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदारा बद्दल प्रेम भावना वाढेल. व्यापारी वर्गास मोठे व्यवहार फायदेशीर ठरतील. आजच्या दिवशी विशेष फायदा होण्याचे योग आहेत.

शुभरंग: जांभळा, शुभ दिशा: नैऋत्य, शुभअंकः ०१, ०८.

मीनः 

आज चंद्राचं शुभ नक्षत्रातील भ्रमणात तुमच्या नवीन योजनांचे व्यवसायात स्वागत होईल. त्यामुळे मानमरातब आपोआप घर चालत येईल. पूर्वी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक गोष्टींचे लाभ मिळणार आहेत. तुमच्या व्यक्तीमत्त्वात सुधारणा कराल. त्याबरोबरच उत्तम बोलण्याची साथ जर व्यवहारात दिलीत तर फायदा होईल. एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. मेहनतीचे फळ मिळण्याचा योग आहे. फक्त भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कायदेशीर बाबींची प्रक्रीया असेल तर निकाल आपल्या बाजुने लागेल. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नवीन वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. शारिरिक कामात वाढ करण्याचा प्रयत्न करा.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.