मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : कुंभ राशीच्या लोकांना सावधानीपूर्वक वाटचाल करावी! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य!

Makar kumbh meen rashi today : कुंभ राशीच्या लोकांना सावधानीपूर्वक वाटचाल करावी! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 09, 2024 11:06 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 9 february 2024 : आज ९ फेब्रुवारी २०२४ रोजी, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस ? वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

Capricon, Aquarius, Pisces
Capricon, Aquarius, Pisces

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र स्वनक्षत्रातुन भ्रमण करीत आहे. युतीयोगात मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल! वाचा राशीभविष्य!

मकरः 

आज चार ग्रहांच्यायोगात नवीन योजना यशस्वी होतील. थोडे धाडस दाखवा. आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन चाणाक्षपणे कराल व त्यात यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. मनइच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. स्वभावा तील रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात नाव लौकिकता प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार वाढणार आहे.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

कुंभ: 

आज राशीस्वामी शनि अनिष्ट स्थानातून भ्रमण करत असल्याने थोडा अहंकार बाजूला ठेवायला हवा. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील. अशावेळी मानसिक अस्थिरता जाणवेल. संतीतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल. त्यांच्या करिअर संबंधी चिंतेत पडाल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती मात्र टाळा. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या. नवीन धोरणे योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. स्थावराच्या देण्याघेण्याचे व्यवहार लांबणीवर टाकणेच उत्तम राहील. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. कारण नंतर पैसे वसूल होणे अवघड जाणार आहे.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०४, ०७.

मीन: 

आज श्रवण नक्षत्रातील चंद्राचं भ्रमण पाहता घरात किंवा घराबाहेर वादाचे मुद्दे उत्पन्न झाले तर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे मात्र पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप उपयोग होईल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढ़तीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवावे. व्यसनापासून दूर रहा. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. कला क्षेत्रातील मंडळींनी या शुभ दिवसाचा फायदा करून घ्यावा. पत्नीकडून कडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल.

शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.