Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज ७ जानेवारी रविवार रोजी, चंद्र तूळ राशीत राहील. सफला एकादशीचा चंद्र गुरूच्या नक्षत्रातून आणि शुक्र मंगळाच्या राशीतुन संक्रमण करत आहे. शुल योगाचेही काही शुभअशुभ परिणाम जाणवतील! वाचा तिन्ही राशींचे भविष्य.
आज चंद्रगोचरात जुनी येणी वसूल होतील. कष्ट खूप करावे लागले तरी यशाचा मार्गही दृष्टीक्षेपात असल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदन मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. दुसर्याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे. एखादया विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. पत्नीकडून सासरच्या मंडळीकडून सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प कामे पुर्णात्वास जातील. आरोग्य उत्तम राहील.
शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.
आज शुल योगातील चंद्रभ्रमणात समजूतदार आणि सोशिक होऊन घरातील अनेक अडचणी सोडवाल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर राहून ध्येयाप्रत पोचण्याचा फार मोठा गुण तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यावर मात कराल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहिल. मुलांच्या बाबतीत शारिरिक समस्या निर्माण होतील. व्यापारात नविन योजना आखाल त्या फायदेशीर ठरतील. घरगुती वातावरण चांगले राहिल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील.
शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०४, ०८.
आज अनिष्ट चंद्रभ्रमणात सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. तुमचा अहंकार कधी दुखावेल हे सागता येत नाही आणि त्यातून कौटुंबिक वातावरणही निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरच होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध रहा. व्यसनी मित्रांपासून दुर रहा. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यो टाळा. आरोग्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. घरातील वातावरण बिघणार नाही याकडे लक्ष द्यावे.
शुभरंग: पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.