Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज ६ जानेवारी शनिवार रोजी, चंद्र तूळ राशीत राहील. तसेच, चंद्र आज स्वाति नंतर विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. अशात मकर, कुंभ व मीन राशीसाठी दिवस कसा जाईल जाणून घ्या.
आज चंद्रगोचरात मनातील उत्तेजना वाढीस जाईल. घरातील वयस्कर व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. भांडणाचा प्रसंग आला तरी त्यात भाग न घेतलेला बरा राहील. नोकरीत बॉसची मर्जी राहील. त्याचा फायदा करून घ्या. एखादी गोष्ट निर्माण करून त्याची अत्यंत कार्यक्षम सूत्रबद्ध जुळवाजुळव करण्यात धन्यता मानाल. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. त्यातून काही बाबतीत क्लेश वाढेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या कामाचे चिज होणार नाही. कामात निरुत्साहीपणा रहिल. व्यापारउद्योगात आर्थिक हानीची शक्यता आहे. चंगळवादा कडे कल राहील. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. व्यापारात पत प्रतिष्ठा सांभाळा. जुनी येणी उधारी वसुलीत व्यवसायिकांना खडतरं परिस्थितीशी सामना करावा लागेल. मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत. जोडीदाराशी कटकटीचे वातावरण राहील.
शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०६, ०८.
आज राहु-चंद्र योगात व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. मनापासून एखाद्या आवडणाऱ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे झोकून देणे तुम्हाला जास्त आवडेल. परंतु तसे वातावरण मिळेल असे नाही. कोणतेही व्यसन ताब्यात ठेवले नाही तर प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवतील. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यापार व्यावसायिकां मध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावध गिरी बाळगा. पैसे गुंतवताना तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत. व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. जोडीदारांकडून सहकार्य लागेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील.
शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०१, ०५.
आज राहु चंद्राच्या प्रभावात कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सावध राहावे. रागाचा पारा चढेल. घरातील गोष्टींकडे जातीने लक्ष घालावे लागेल. लोकांच्या संपर्कात रहाण्याचे कसब वापरलेत बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. एकमेकांमधील संबंध जपलेत तर वातावरण प्रसन्न राहु शकते. प्रभावात अध्यात्म प्रती मन झुकेल. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. क्रुर फल देणारं नक्षत्र असल्याने सावधानीपूर्वक वाटचाल करावी. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याचा शक्यता आहे. मानहानी होण्याची संभावना आहे. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. जोडीदारासोबत सामंजस्यपूर्ण वागा. अपराधी भावना वाढीस लागेल. व्यापारात हानी होण्याची शक्यता आहे. स्वतःची प्रकृती सांभाळा.
शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.