Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र वृश्चिक राशीतुन व ज्येष्ठा आणि मूळ नक्षत्रातुन भ्रमण करत आहे. षड्तीला एकादशीचा दिवस मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल! वाचा राशीभविष्य!
आज गुरू-चंद्र योगात प्रयत्न सफलदायक ठरतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घेण्यात आघाडीवर राहिल्यामुळे घरातील वातावरणही आनंदी राहील. व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. कोणावर विसंबून राहिलात तर मात्र तुमचा कार्यभाग बुडाला म्हणून समजा. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन लाभेल.
शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०१, ०८.
आज चंद्र गुरूच्या संयोगात नवीन वस्तु खरेदीस अनुकूल दिवस आहे. कोणत्याही बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांनी काही बाबतीत ठोस निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायात इतरांबरोबर सौजन्य दाखवल्यामुळे तसेच सहकार्यही तुम्हाला मिळेल. जुनी येणी वसूल होतील. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. आत्म विश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल.
शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०५, ०९.
आज चंद्रबल अनिष्ट असल्याने आर्थिक बाबतीत व्यवहार काळजीपूर्वक करा. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांनी मोठी जोखीम घेण्याचे टाळावे. अविचाराने कर्ज काढू नका. हप्ते फेडताना त्रास होईल. व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्यातून सहीसलामत बाहेर पडाल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. कुटुंबा तील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदारा सोबत दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यापारानिमित्त प्रवास होईल. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.