Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज ४ जानेवारी गुरुवार रोजी, चंद्र बुध आणि मंगळाशी योग करेल. गुरू-हर्षल वर चंद्राची पुर्ण दृष्टी असेल. कालाष्टमीचं चंद्रबल कसं असेल! वाचा मकर, कुंभ व मीन राशीचे भविष्य.
आज चंद्र भ्रमणातून शुभ फलदायी घटना घडणार आहेत.सरकारी नोकरीतल्या लोकांना मानमरातब प्रमोशन मिळण्याचे योग येतील. कोणत्याही बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्याल. जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात आवश्यक ते बदल करण्याच्या संधी मिळतील. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकां कडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणीं कडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल. त्या प्रयत्नात यश मिळेल.
शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०५, ०८.
आज शनि-चंद्र प्रतीयोगात घरासंबंधी समस्या होऊ शकते. कोणत्याही कामाचे नियोजन करण्यात मात्र कमी पडण्याची शक्यता आहे. बुद्धीचा उपयोग विधायक कामासाठी करणे आवश्यक आहे. मित्रपरिवारावर जास्त विश्वास टाकणे योग्य ठरणार नाही. आर्थिक विवंचना थोडी सतावेल. आपल्या चीज वस्तू सांभाळणे आवश्यक आहे. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. व्यापारीवर्गाकरिता आजचा दिवस नुकसानदायक राहण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजी पूर्वक व्यवहार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. वाहन जपून चालवा. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्या.
शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०१, ०७.
आज चंद्र गुरूशी संयोग करीत असल्याने आर्थिक आघाडीवर प्रगती होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय नोकरी या संदर्भातील कामे लवकर घडून येतील. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. बेकारांना नवीन नोकरी लागण्याची संधी उपलब्ध होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे.संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. स्वभावातील रागीटपणावर मात्र नियंत्रण ठेवा.
शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.