Makar kumbh meen rashi today : मीन राशीच्या लोकांचा तापटपणा वाढेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : मीन राशीच्या लोकांचा तापटपणा वाढेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य!

Makar kumbh meen rashi today : मीन राशीच्या लोकांचा तापटपणा वाढेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य!

Feb 04, 2024 11:40 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 4 february 2024 : आज ४ फेब्रुवारी २०२४ रोजी, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल रविवारचा दिवस ? वाचा आजचे राशीभविष्य!

Capricon, Aquarius, Pisces
Capricon, Aquarius, Pisces

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र मंगळाच्या राशीतुन भ्रमण करणार असून, षडाष्टक योगात मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा रविवारचा दिवस! वाचा राशीभविष्य!

मकर: 

आज शनिच्या नक्षत्रातून होणाऱ्या चंद्रभ्रमणात नातेवाईकांमध्ये आर्थिक व्यवहार करू नयेत. थोडे आस्थिर आणि चंचल बनाल. व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. प्रकृती स्वास्थ्य वरचेवर बिघडण्याची शक्यता आहे. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक जोडिदार भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहिल. मित्रांकडून आयकारक प्रस्ताव येतील. कुटुंबात मंगलकार्याची रुपरेखा नियोजन कराल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल.

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०६, ०८.

कुंभ: 

आज चंद्र-हर्षल षडाष्टक योगात आपल्या हातून कोणता अविचार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक निर्णय चुकीचे घेतले जाण्याची शक्यता आहे. कर्जबाजारी असणाऱ्यांनी हप्ते वेळेवर फेडण्याची खबरदारी घ्यावी. शांत धीमेपणाने काम करण्याच्या वृत्तीमुळे रचनात्मक कामाकडे ओढ राहील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. इतरांवर जास्त विश्वासटाकत नसल्यामुळे कामाचा गाडा स्वत: ओढाल परंतु त्यामुळे थकवा जास्त जाणवेल. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल. व्यापारात आपले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गानी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे. मानसिक दृष्टीकोनातून क्लेश उत्पन्न करणार दिनमान आहे.

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.

मीन: 

आज गुरू-चंद्र संयोगात चंद्रबलं उत्तम राहील. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. तुमची मते मुलांच्या गळी उतरवण्यासाठी जरा जास्तच शक्ती खर्च करावी लागेल. संघर्षाचा आणि प्रतिकाराचा भाग जरा जास्त राहिल्यामुळे तापटपणा वाढेल. दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. दुसऱ्यावर कुरघोडी करण्या अगोदर विचार करावा लागेल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्र मैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेम प्रकरणात संबंध दृढ होतील.

शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

Whats_app_banner