मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : वर्षाचा शेवट पदोन्नतीचा! वाचा मकर, कुंभ व मीन राशीचे भविष्य

Makar kumbh meen rashi today : वर्षाचा शेवट पदोन्नतीचा! वाचा मकर, कुंभ व मीन राशीचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Dec 31, 2023 10:36 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 31 December 2023 : मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल वर्षाचा शेवटचा दिवस? वाचा राशीभविष्य!

Capricon, Aquarius, Pisces
Capricon, Aquarius, Pisces

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज ३१ डिसेंबर रविवार रोजी, प्रीती योगात सुट्टीचा आणि वर्षातील शेवटचा दिवस कसा असेल! जाणून घ्या मकर, कुंभ व मीन राशीचे आजचे भविष्य.

मकरः 

आज चंद्र प्लुटोशी षडाष्टक योग करत आहे. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. कर्जफेड करण्या साठी अनुकूल दिवस आहे. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. तुमच्या स्वभावा तील वेगळे कंगोरे प्रकर्षाने दिसून येतील. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. गायन कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

कुंभः 

आज चंद्र अनिष्ट स्थानातून गोचर करत असल्याने कर्जप्रकरण काळजीपूर्वक हाताळा. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार केल्यास निराश होण्याची पाळी येणार नाही. धडाडी दाखवाल परंतु अशावेळी कोणताही अविचार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणात्मक राहिल. व्यवसायिकांचे उद्योगधंदयात लक्ष कमी होईल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. व्यापारात सामंजस्य पणाची भुमिका घ्यावी. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. बोलण्यावर संयम ठेवा.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०१, ०८.

मीनः 

आज भाग्यातील चंद्रभ्रमण विशेष लाभदायक ठरणार आहे. धंद्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष रहातील. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहिल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल. वैवाहिक जोडीदाराला कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल.

शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.