Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज ३ जानेवारी बुधवार रोजी, चंद्र रवि आणि बुधाशी संयोग करणार आहे. चंद्र-केतु युती व राहु-चंद्र प्रतियोग आणि शोभन योगात मकर, कुंभ व मीन राशीसाठी दिवस कसा राहील. वाचा राशीभविष्य.
आज चंद्रबल उत्तम राहणार आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेन. आपल्या समोर नवीन व्यवसायाच्या प्रस्ताव येतील. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. आपल्याला आठवण येत असलेल्या पूर्वीच्या मित्र मैत्रिणींच्या आप्तेष्टांच्या गाठी भेटी होतील. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक जोडिदार भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहिल. व्यवहार चातुर्य संयमी भूमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होईल. कामाप्रती सजग रहा. मित्रांकडून आयकारक प्रस्ताव येतील. कुटुंबात मंगलकार्याची रुपरेखा नियोजन कराल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. सर्वच स्तरातील नातेसंबंधात स्नेह निर्माण होईल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहिल.
शुभरंग: जांभळा, शुभदिशाः नेॠत्य, शुभअंकः ०७, ०८.
आज राहु-चंद्र प्रतीयोगात समिश्र दिनमान राहील. कौटुंबिक तणाव देत राहतील. परंतु कोणाचेही बोलणे मनावर घेऊ नका आणि संयमाने काम करा. कुटुंबातील सदस्यांसोबत सलोख्याने रहा. पैशाअभावी कोणतेही काम थांबणार नाही. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रेम प्रकरणातील जुने मतभेदही दूर होतील. जीवन साथीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वादविवाद होण्याची शक्यता आहे. शत्रु वरचढ पणा करण्याची शक्यता आहे. मनावर संयम ठेवून रहा. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गानी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे. नोकरीत वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. शारिरिक त्रास जुना आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. मानसिक दृष्टीकोनातून क्लेश उत्पन्न करणार दिनमान आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्या. वैद्यकिय उपचारा वर खर्च होण्याची शक्यता आहे.
शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०७.
आज चंद्र अनुकूल असल्याने अपूर्ण राहिलेली कामे वेळेत पूर्ण कराल. नोकरीत वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. नोकरीत प्रगतीकारक दिवस असुन नवीन चांगली संधी अथवा पदोन्नती होईल. आपण पूर्वी घेतलेल्या कष्टाचे फळ आपणास मिळेल. नविन मित्र भेटतील. दुसऱ्यावर सहज आपली छाप पडू शकेल. रोजगारात कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. मुलांच्या प्रगतीने मन समाधानी राहिल. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल. कला क्षेत्रातील मनोरंजन विश्वातील मंडळीना उत्तम दिवस आहे. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. कुटुंबांवर वाहन घर खरेदीस अनुकूल दिवस आहे. आरोग्य स्वास्थ उत्तम राहील. ज्येष्ठ व्यक्तिंच्या सहवास लाभेल. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहिल.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.