Makar kumbh meen rashi today : मीन राशीच्या लोकांचा खर्चाचा आकडा वाढेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : मीन राशीच्या लोकांचा खर्चाचा आकडा वाढेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य!

Makar kumbh meen rashi today : मीन राशीच्या लोकांचा खर्चाचा आकडा वाढेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य!

Jan 28, 2024 11:40 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 28 january 2024 : आज २८ जानेवारी २०२४ रोजी, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल रविवारचा दिवस ? वाचा आजचे राशीभविष्य!

Capricon, Aquarius, Pisces
Capricon, Aquarius, Pisces

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्रदेव राहु आणि नेपच्यून बरोबर प्रतियोग करीत आहेत. मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा रविवारचा दिवस! वाचा राशीभविष्य!

मकरः 

आजच्या चंद्रगोचरात कामाचे उत्तम नियोजन करणार आहात. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. नवीन योजनेची सुरुवात कराल. जोश पूर्वक कामात रस घ्याल.

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०४, ०८.

कुंभः 

आजच चंद्रभ्रमणात चांगली फले मिळतील. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष घालावे लागेल. अती संवेदनशील असल्यामुळेच थोडा तापट पणाही वाढेल. तुमच्या वागणुकीमुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढीस लागेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगती कारक दिनमान आहे. आपला नावलौकिक वाढेल. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. अंगीभूत गुणासाठी चांगले वातावरण राहिल. संत साहित्य आध्यात्मीक स्वरुपाचे लेखन होईल.

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

मीनः 

आज अनिष्ट ग्रहमान असल्याने वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत हे ठरवायला लागेल. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. खर्चाचा आकडा थोड़ा वाढल्यामुळे तसे वाटणे साहजिक असले तरी पैसे मिळणार आहेत. कोणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. कोणाला जामीनही राहू नये. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. आपल्याला मनस्ताप करावा लागेल. व्यवसायिक व्यक्तींनी आज मात्र जपुन पाऊल टाकावी लागणार आहेत. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून रहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. आत्मविश्वास आणि अतिउत्साही पणा टाळावा. अतिरेक वृत्तीवर आळा घाला. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. साथीदारांच्या कामावर लक्ष असु द्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. पत्नीशी कुटुंबा तील इतर सदस्यांसी मनमुटाव होण्याची शक्यता आहे.

शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

Whats_app_banner