Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र मिथुन राशीत असून, आज पौष शुक्ल चतुर्दशी तिथी आहे. विष्कुंभ योगात कसा असेल मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी दिवस! वाचा राशीभविष्य!
आज विष्कुंभ योगात आपणास मानसिक त्रास निर्माण होणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही तडजोडी कराव्या लागतील. घरात आणि घराबाहेर मानसिक अस्वस्थता जाणवली तरी आर्थिक समाधान मिळाल्यामुळे स्वस्थ राहाल. थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे. ज्ञान आणि व्यवहार यांच्या योग्य नियोजनाचा मेळ घातला तर काही गोष्टी फायद्याच्या ठरतील. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. पत्नी जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका. नाहीतर कठीण प्रसंगाशी झगडावे लागेल.
शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०५, ०८.
आज शनि-चंद्र योगात बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मनोधैर्य सांभाळा. व्यवसायात लहरीपणा ठेऊन चालणार नाही. कडक बोलण्याने लोकांची मने दुखावली जातील. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. त्यामुळे पथ्यपाणी सांभाळणे हिताचे ठरेल. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. अविचारीपणा योग्य नाही. विचारा अंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळपणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. प्रकृति अस्थिर राहील.
शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०१, ०७.
आज शनिशी होणारा चंद्रयोग पाहता धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पैशाचे पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्यावी. अनाठायी खर्च होईल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्यासारख्या घटना घडतील. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवासाच टाळा.
शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.