चंद्र अनिष्ट स्थानातून गोचर करत आहे. कर्जप्रकरण काळजीपूर्वक हाताळा. सारासार विचार करून निर्णय घ्या. निराश होण्याची पाळी येणार नाही. धाडसी निर्णय घेताना कोणताही अविचार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. घरातील वातावरण तणावाचं राहील. व्यवसायिकांचं उद्योगधंद्यात लक्ष लागणार नाही. व्यापारात आर्थिक अडचणी येऊ शकतात. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. निरर्थक कामात वेळ जाईल, तो टाळा. स्थावर मालमत्तेच्या संदर्भात अडचण येण्याची शक्यता आहे. व्यापारात सामंजस्याची भूमिका घ्या. मनस्ताप होणाऱ्या घटना टाळा. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. शुभ रंग: जांभळा शुभ दिशा: नैऋत्य. शुभ अंकः ०१, ०८.
चंद्रभ्रमण शुभ स्थानातून होणार असल्यानं लाभदायक ठरेल. धंद्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. आचरण उत्तम राहिल्यामुळं लौकिक वाढेल. वारसा हक्कानं धन व संपत्ती लाभेल. तुमची मतं बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळं सर्व खूष राहतील. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायात तेजीत राहील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायाच्या निमित्तानं प्रवास होईल. जमिनीच्या व्यवहारातून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म, पूजापाठ अशा धार्मिक कार्यात मन रमेल. वैवाहिक जोडीदाराला कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. शुभ रंग: निळा शुभ दिशा: पश्चिम. शुभ अंकः ०५, ०८.
अतिगंड योगात बुद्धीचा कस लागेल. त्यातून फायदा होईल. मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळं तुमचा आनंद अधिकच दुणावेल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी भाग्याची साथ लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. तुमच्या रसाळ वाणीमुळं लोक आकर्षित होतील. शुभ रंग: पिवळा शुभ दिशा: ईशान्य. शुभ अंकः ०३, ०५.
संबंधित बातम्या