Makar kumbh meen rashi today : मकर राशीच्या लोकांनी आज महत्वाचे निर्णय घेऊ नये! वाचा तिन्ही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : मकर राशीच्या लोकांनी आज महत्वाचे निर्णय घेऊ नये! वाचा तिन्ही राशींचे भविष्य!

Makar kumbh meen rashi today : मकर राशीच्या लोकांनी आज महत्वाचे निर्णय घेऊ नये! वाचा तिन्ही राशींचे भविष्य!

Published Jan 23, 2024 10:44 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 23 january 2024 : मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल मंगळवारचा दिवस ? वाचा आजचे राशीभविष्य!

Capricon, Aquarius, Pisces
Capricon, Aquarius, Pisces

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र मिथुन राशीत असून, आज पौष शुक्ल त्रयोदशी तिथी आहे. वैधृती योगात कसा असेल मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी दिवस! वाचा राशीभविष्य!

मकर: 

आज चंद्र-मंगळ संयोगात अनपेक्षित फळे मिळण्याची शक्यता आहे. चंद्रभ्रमण हे अशुभ स्थानातून होत आहे.व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळा. अडचणी येऊ शकतात. कामांना गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठ मंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष दया. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत.

शुभरंग: जांभळा, शुभदिशाः नेॠत्य, शुभअंकः ०७, ०८.

कुंभ: 

आज चंद्रबल मिळाल्याने नवीन कामकाज सुरु करण्यासाठी अनुकूल काळ आहे. ठोस निर्णय घेऊ शकाल. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे अडखळल्यासारखे होईल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकी साठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. संततीकडून समाधान सुख लाभेल.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

मीन: 

आज मंगळ-चंद्र योगात हा कलह उत्पन्न होणारा योग आहे. देवाण घेवाणीपूर्वी कागदपत्रे वाचा. वाद घालू नका. निजी जीवनात मोठ्या निर्णयात कुटुंबाचे समर्थन प्राप्त होणार नाही. घरातील व्यक्तींशी क्षुल्लक कारणा वरून हुञ्जत घालू नका. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. कुटुंबापासुन दुर जाल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिण नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा. प्रकृती वर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. विरोधकाच्या कारवायात वाढ होईल.

शुभरंग: पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.

Whats_app_banner