Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र वृषभ राशीत असून, मृगशीर्ष या मंगळाच्या नक्षत्रातुनही चंद्राचं गोचर होत असल्याने सप्ताहातील पहिल्याचं दिनमानावर मंगळाचा विशेष प्रभाव राहील. मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांना कसा जाईल दिवस! वाचा राशीभविष्य!
आज शुक्र-चंद्र चंद्र योगात आपणास दिनमान उत्तम राहील. आपला आत्मविशास वाढीस लागेल. आत्मविश्वास उत्तम असल्यामुळे कोणत्याही समस्येला पाठीवर घेण्याची ताकद तुमच्याकडे राहील. तरुण वर्गात नवीन ओळखी होतील आणि त्याचे रुपांतर प्रेमात होऊ शकेल. काही आडाखे निश्चित बांधाल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल. मित्रमैत्रिणी नातेवाईका कडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहिल. स्वभावा तील गुणदोषं मात्र टाळावेत. शासकिय योजनेतून लाभ होईल.
शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.
आज बुधचंद्र प्रतीयोगात आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. प्रेमीजनांना त्यांची आवडती व्यक्त भेटल्यामुळे आनंदी रहाल. तरुणांच्या अती आधुनिक वागण्यामुळे त्यांचे मोठ्या लोकांशी पटणार नाही. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. बढतीची संधी आहे. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक जिवन आनंदी राहिल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संततीविषयी चिंता मिटेल. कोर्टकचेरीची प्रकरण असतील तर निकाल आपल्या बाजूने लागेल. जमीन खरेदी-विक्रीतून अधिक लाभ होईल. शिक्षक वर्गाचा मान-सम्मान वाढेल. आजचे दिनमान सफलतादायक आहे. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींच्या मानधनात वाढ होईल. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल.
शुभरंग: जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०७, ०८.
आज चंद्र अनिष्ट अशुभ परिणाम देईल. अशुभ फल प्राप्त होतील. नोकरीत थोडा दूरदर्शीपणा ठेऊन त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल. कधीकधी एखादा निर्णय घेण्याबाबत तुमच्याकडून अविचारही होऊ शकतो. कोर्टकचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. मनस्वास्थ सांभाळा. मन स्थिर ठेवा. प्रतिष्ठा धुळीला मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या व मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया घालूनका. मागील स्मृती उजाळल्याने दुखः होईल. अपघात दुघर्टना घडण्याची शक्यता आहे.
शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०४, ०७.