Makar kumbh meen rashi today : कुंभ राशीच्या लोकांनी आज आर्थिक गुंतवणूक टाळा! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!-makar kumbh meen rashi today 22 february 2024 capricon aquarius pisces zodiac signs prediction ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : कुंभ राशीच्या लोकांनी आज आर्थिक गुंतवणूक टाळा! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

Makar kumbh meen rashi today : कुंभ राशीच्या लोकांनी आज आर्थिक गुंतवणूक टाळा! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

Feb 22, 2024 12:18 PM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 22 february 2024 : आज २२ फेब्रुवारी २०२४ रोजी, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल गुरुवारचा दिवस? वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

Makar Kumbh Meen
Makar Kumbh Meen

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र कर्क राशीतुन भ्रमण करत असून. सौभाग्य योग घटीत होत आहे. विश्वकर्मा जयंतीचा आजचा दिवस मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल! वाचा राशीभविष्य!

मकरः 

आज अनिष्ट चंद्रभ्रमणात करियरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कलाकारांना कला क्षेत्रातवाव मिळेल पण त्यापासून आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही. योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध वास्तवाशी लावण्याचा प्रयत्न करू नये. दिनमान कामाच्या दृष्टीकोनातून कष्टदायक असणार आहे. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील.

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०४, ०८.

कुंभः 

आज चंद्राशी होणारा योग पाहता थोडेसे धूर्त संयमितपणा बरोबरच धोरणी रहाल. काही करण्याची खूप स्वप्ने रंगवली असतील. तर त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणारांना चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा बेपर्वाईपणा राहील. प्रतिकुल परिणाम येण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल. आपल्या स्वभावात चंचलता निर्माण होईल. मोठी आर्थिक गुंतवणूक आज टाळा.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०६, ०८.

मीनः 

आज गुरुपुष्यामृत योग आहे. नोकरी व्यवसायात मनासारखे कार्यामुळे तब्येत खूष राहील. सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत त्यांना तेथून चांगले संकेत मिळाल्यामुळे छोटी ट्रीप करावीशी वाटेल. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील. मित्रमंडळींचे सहकार्य लाभणार आहे.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.