Makar kumbh meen rashi today : मीन राशीच्या लोकांनी नवीन योजना आज टाळा! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : मीन राशीच्या लोकांनी नवीन योजना आज टाळा! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

Makar kumbh meen rashi today : मीन राशीच्या लोकांनी नवीन योजना आज टाळा! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

Feb 21, 2024 10:10 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 21 february 2024 : आज २१ फेब्रुवारी २०२४ रोजी, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल बुधवारचा दिवस? वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

Makar Kumbh Meen
Makar Kumbh Meen

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र मिथुन राशीतुन भ्रमण करत असून. पुनर्वसु नक्षत्र व कौलव करणात मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

मकर

आज अनुकूल चंद्र भ्रमणात स्वत:ची मते बिनधास्त मांडून आपल्या मताशी ठाम रहाल. राजकारणी आणि मुत्सद्दी स्वभावामुळे हरतऱ्हेचे डावपेच खेळायला तुम्ही तयार असाल. लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल. उपासना करून आध्यात्मिक उंची गाठाल. नवनवीन योजना डोक्यात घोळतील आणि त्या राबवण्यासाठी कष्टाचे डोंगर उपसाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात सफलता मिळण्याचे योग आहेत. व्यापारात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्व वाढेल. औद्योगिक कार्यात नवीन योजनेतून लाभ होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. नोकरीत नवीन संकल्पना मांडाल.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.

कुंभ: 

आज प्रतिकूल ग्रहमान असल्याने परदेशगमनासाठी अडचणी उद्भवतील. नोकरी व्यवसायात तुमच्या समोरचा माणूसही तेवढाच तुल्यबळ असल्यामुळे मनाविरुद्ध माघारही घ्यावी लागेल. मुलांमध्ये चिकाटी आणि निग्रही वृत्तीचा अभाव दिसल्यामुळे त्यांना योग्यवेळी समज द्यावी लागेल. आत्मप्रौढी आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक राहा. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल असी स्थिती आहे. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. नोकरीत वरिष्ठ सदस्यांसोबत विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०५, ०८.

मीन: 

आज चंद्रबल अनिष्ट आहे. समोरच्या माणसाच्या गूढ वागण्याचा थोडा त्रासच होणार आहे. कोणालाही जामीन राहू नये. कधी कधी दुसऱ्यांचा विचार न करता बोलणे झाल्यामुळे दुसऱ्यांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांना तुमची ठाम मते पटणार नाहीत. तेथे वादविवाद होण्याची शक्यता आहे. थोडा उद्धटपणा आणि अतिशयोक्ती बोलणे आवरायला लागेल. विधायक गोष्टी कराल पण भांडखोरपणाने इतरांची नाराजीही ओढवून घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात मितभाषी रहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. व्यापारात प्रतिकुल परिस्थिती निर्माण होईल. भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. नोकरीत आपल्या मनाच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. आपले विरोधक हितशत्रुकडून आपल्या विरोधात वातावरण तयार केले जाईल. मन लावून काम करा. व्यापारात नवीन योजना असतील तर आज टाळा.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

Whats_app_banner