मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : मीन राशीच्या लोकांसा मोठ्या अधिकाराची नोकरी मिळेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य!

Makar kumbh meen rashi today : मीन राशीच्या लोकांसा मोठ्या अधिकाराची नोकरी मिळेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 02, 2024 11:54 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 2 february 2024 : आज १ फेब्रुवारी २०२४ रोजी, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस ? वाचा आजचे राशीभविष्य!

Capricon, Aquarius, Pisces
Capricon, Aquarius, Pisces

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र शुक्राच्या राशीतुन भ्रमण करणार असून, राहूचं नक्षत्र आणि शूल योगात मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा शुक्रवारचा दिवस! वाचा राशीभविष्य!

मकरः 

आज चंद्रबल अनुकूल असल्याने नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीमुळे आर्थिक लाभ चांगले होतील. अडथळ्याच्या शर्यतीतून का होईना पण पैशाच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील. घरातील हलक्या फुलक्या वातावरणामुळे सुखावून जाल. करियरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल. स्वतंत्रपणे कार्य करण्यात धन्यता मानाल. नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये संशोधन करून इतरांच्या कौतुकास पात्र व्हाल. हसतमुख राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल. कौटुंबिक सहकार्याने चांगला दिवस जाणार आहे. परदेश भ्रमणासाठी उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रिणींबरोबर सलोख्याचे संबंध होतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहिल. व्यापारात आर्थिक लाभ होणार आहे. जुनी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कर्ज प्रकरण मंजुर होतील. प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपुन घ्यावा. नवीन योजनेत वाढ विस्तार करण्यासाठी अनुकुल दिवस आहे.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०१, ०८.

कुंभः 

आज प्रतिकूल चंद्रभ्रमणात भावनांची थोडीशी ओढाताण झाल्यामुळे मनाला ताण जाणवेल. संतती कडून अपेक्षाभंग होऊ शकतो. मुलांच्या मार्गदर्शनासाठी थोडा वेळ ठेवावा लागेल. स्पर्धा परीक्षांसाठी भरपूर कष्ट राखून घ्यावे लागतील. व्यसनांपासून सावध रहा नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. प्रवासामध्ये आपल्या चीजवस्तूंची काळजी घ्या. छोट्याशा कारणाने मनशांती बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या कुवती पेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवा. आळश झटकुन कामाला लागा. शारिरिक आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदारासोबत वाद होण्याची शक्यताआहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढेल.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०१, ०८.

मीनः 

आज शुल योगात आपणास अत्यंत शुभ दिवस असणार आहे. लेखक पत्रकारांना चांगले ग्रहमान आहे. मित्रांच्या गोतावळ्यात जास्तीत जास्त रहाण्याचा योग आहे. नोकरी व्यवसायात आपण करीत असलेल्या कामाची चांगल्या पद्धतीने तपासणी करा. सूचक स्वप्ने पडतील. मानमरातब अधिकाराचे योग संभवतात. अनेक गोष्टी बौद्धीक निकषावर घासून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. स्वत:बरोबर दुसऱ्याचाही फायदा कराल. शिवाय स्वतःकडचा अधिकार सहजासहजी सोडणार नाही. व्यवसायिकांना योजना पद्धतीने केलेल्या कामामुळे आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. नविन योजनेतून लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.