मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : मकर राशीच्या लोकांचा सुखचैनीच्या वस्तूत खर्च वाढेल! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

Makar kumbh meen rashi today : मकर राशीच्या लोकांचा सुखचैनीच्या वस्तूत खर्च वाढेल! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 19, 2024 11:13 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 19 february 2024 : आज १९ फेब्रुवारी २०२४ रोजी, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल सोमवारचा दिवस ? वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

Makar Kumbh Meen
Makar Kumbh Meen

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्रमा मंगळ-शुक्र-प्लुटोशी प्रतियोगही करत आहे. मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल सप्ताहातील पहिला दिवस! वाचा राशीभविष्य!

मकर: 

आजच्या राहुच्या नक्षत्रातून होणाऱ्या चंद्रभ्रमणात कोणतीही नवीन योजना राबवताना विचार अवश्य करावा. घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटणार नाहीत. त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. परदेश गमनात अडचणी आल्यामुळे परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताण तणात्मक राहिल. मान अपमानाचे प्रसंग घडतील. नोकरीत अनुकुलता राहिल. शासकीय कामकाजा करिता सफलतादायक दिवस आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. प्रेम प्रकरणात विरोधाला सामोरे जावे लागेल. महत्वाची कागदोपत्रे मात्र संभाला. सुखचैनीच्या वस्तूत खर्च वाढेल.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

कुंभ: 

आजच चंद्रबल अनिष्ट असल्याने अंहकारी वृत्तीमुळे यांचे नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. अती भावना प्रधानतेमुळे मात्र मनःस्तापाचे प्रसंग येतील. आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. मुलाच्या बाबतीत वाजवी पेक्षा जास्तच विचार कराल. कुटुंबातील आपसातील मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. कोणताही विषय जास्त ताणू नये. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लोकांचा विरोध असहकार्य लाभेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असंतोष निर्माण होईल.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०४, ०७.

मीन: 

आज चंद्रभ्रमणात आनंदी आणि उत्साही राहिल्या मुळे सहवासात येणाऱ्यांनाही आनंदी करून जाल. घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायलामिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. परंतु नोकरी व्यवसायात मात्र आपला वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार वर्गाची व्यवसायात वाढ होईल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. कलाक्षेत्रातील महिला अनुकूल प्रगतीच शिखर गाठतील. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०९.

WhatsApp channel