मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : कुंभ राशीच्या लोकांचे मन अस्वस्थ राहील, वाचा तिन्ही राशींचे भविष्य!

Makar kumbh meen rashi today : कुंभ राशीच्या लोकांचे मन अस्वस्थ राहील, वाचा तिन्ही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 18, 2024 10:15 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 18 january 2024 : मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल गुरुवारचा दिवस ? वाचा आजचे राशीभविष्य!

Capricon, Aquarius, Pisces
Capricon, Aquarius, Pisces

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र मेष राशीत असून, आज मासीक दुर्गाष्टमी आहे व शाकंभरीदेवी नवरात्रोत्सवारंभ होत आहे. मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांवर देवीची कृपा राहील का? आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

मकरः 

आज लाभ देणारी गुरू-चंद्र प्रतीयोग पाहता उद्योग तेजीत राहतील. किर्ती प्रसिद्धीच्या झोतात आल्यामुळे मानसिक स्वास्थ्य मिळेल. तुमच्यातील कलेला समाजा तील लोकांची दाद मिळेल. केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. बंधुप्रेम मिळणार आहे. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. नवीन व्यक्तीशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. आपल्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळेल. मनातील इच्छित काम मार्गी लागतील. घरात आप्तेष्ट नातेवाईकांचे आगमन होईल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना नवीन प्रकल्प हाती येतील. संशोधन पर अभ्यासाच्या प्रारंभास आजचा दिवस उत्तम आहे.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०१, ०८.

कुंभः 

आज प्रतिकूल ग्रहमान असल्याने आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहिल्यामुळे नोकरी व्यवसायात त्याचा कामावर परिणाम होईल. आर्थिक बाबतीत मोठे व्यवहार टाळावेत. परिस्थितीचे योग्य आकलन न झाल्यामुळे निर्णयात अथवा बोलण्यात ठामपणा आढळणार नाही. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या विषयी गैरसमज आणि संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. कौटुंबिक बाबीवर खर्च वाढेल. कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. निर्णय घेताना द्विधा मनस्थिती उदभवेल. मोठे धाडसी निर्णय घेऊ नयेत. मित्रमैत्रिणींबरोबर व्यवहार करताना जपून करा. मन अस्वस्थ राहील.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०४, ०८.

मीनः 

आज आपल्या गुरूचं बलं लाभल्याने आत्मविश्वास वाढल्यामुळे ध्येयावर प्रेम कराल. सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढे जाल. समोर आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवी खरेदी कराल. व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. नव्या खरेदीने कुटुंबात आंनदी वातावरण राहिल. नोकरी व्यवसायात समाधानकारक सुधारणा जाणवेल. पुर्वीचे प्रकल्प व कामे आज आपणास मदतीला येणार आहेत. धरसोड मनोवृत्ती सोडा. ध्येय निश्चित करा. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. आपल्या हातून शुभ कार्य घडतील. वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीं सोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.